पुणे -३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पुणे फेस्टिव्हल गोल्फ कप टूर्नामेंटम’ 2 दिवस संपन्न झाली. पुण्यातील येरवडा येथील ‘पुणे गोल्फ कोर्स’ येथे झालेल्या या स्पर्धेस आज दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता सुरुवात झाली.
या स्पर्धा ग्रीन सम स्टेबल फोर्ड कॅटेगरी हँडीकॅप असा प्रकारात गोल्ड आणि सिल्वर डिवीजनमध्ये आयोजित केले होत्या. या स्पर्धेत २६० स्पर्धकांनी भाग घेतला होता. यामध्ये पुणे व परीसरातील विविध कंपन्यांचे वरिष्ठ व्यवस्थापक देखील सहभागी होते.
पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य ससमन्वयक अॅड. अभय छाजेड, पुणे क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा आणि उपाध्यक्ष गौरव गढोके यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. या स्पर्धेचे संयोजन पुणे गोल्फ क्लबचे जयदीप पटवर्धन आणि प्रदीप दळवी यांनी केले होते. या स्पर्धेचे स्वागत इंद्रनील यांनी केले असून प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पुणे फेस्टिव्हलचे क्रीडा समन्वयक प्रसन्न गोखले यांनी केले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
१. गोल्ड विभाग – ग्रीन सम स्टेबल फोर्ड कॅटेगरी – १८ होल्स
प्रथम क्रमांक – आदित्य पुलास्कर आणि राजीव पुलास्कर (४१ गुण)
पहिला रनरप – डीसी सूद आणि सायनी गिरीश (३९ गुण)
दुसरा रनरप – नीरज गुलाटी आणि बिजय लेंका (३९ गुण)
२. सिल्व्हर विभाग – ग्रीन सम स्टेबल फोर्ड कॅटेगरी – १८ होल्स
प्रथम क्रमांक – अंकित मिश्र आणि अक्षदीप कौल (४२ गुण)
पहिला रनरप – ठरेश मेनन आणि अमर परमार (४२ गुण)
दुसरा रनरप – दलजित अरोरा आणि आरजी बहाले (३९ गुण)
३.– गोल्ड विभाग – ग्रीन सम स्टेबल फोर्ड कॅटेगरी – ०९ होल्स
प्रथम क्रमांक – सुरज लिगाडे आणि सुनीलl शिंगटे (२२ गुण)















