Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra

#Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

Dr. Nitin Karir appointed as Chief Secretary of Maharashtra : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी (Maharashtra Chief Secretary) डॉ. नितीन करीर(Dr.Nitin Karir)  यांची आज नियुक्ती करण्यात आली. डॉ. करीर(Dr.Karir)यांनी आज संध्याकाळी मुख्य सचिवपदाचा कार्यभार मनोज सौनिक(Manoj Saunik )यांच्या कडून स्वीकारला.

डॉ. करीर(Dr.Karir)  सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ( Additional Chief Secretary, Finance Department) म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांनी महसूल(revenue) आणि वने(Forest) तसेच नगर विकास विभागाचे (Department of Urban Development ) अतिरिक्त मुख्य सचिव( Additional Chief Secretary )म्हणून काम पाहिले आहे. डॉ. करीर यांनी एमबीबीएस(MBBS) पदवी घेतली. त्यांची 1988 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत (Indian Administrative Service) निवड झाली. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी( Pune Zilla Parishad  CEO) म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सांगली(Sangali), पुणे जिल्हाधिकारी(Collector) म्हणून काम केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालक(Director General of Information and Public Relations), नोंदणी महानिरीक्षक( Inspector General of Registration ), पुणे महापालिकेचे आयुक्त (Commissioner of Pune Municipal Corporation), पुणे विभागीय आयुक्त(Pune Divisional Commissioner) अशा विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव(Principal Secretary to Chief Minister), विक्रीकर आयुक्त(Sales Tax Commisioner), जमाबंदी आयुक्त ( Commissioner of Jamabandi )या पदावरही काम केले आहे.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे (सेवा) अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार यादव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी मुख्य सचिव डॉ. करीर यांचे अभिनंदन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *