Samyukta Dhulugade is this year's Miss Pune Festival

संयुक्ता धुलुगडे ही यंदाची मिस पुणे फेस्टिव्हल

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- देशामध्ये आकर्षण बनलेली आणि तरुणींमध्ये लोकप्रिय असलेली यंदाच्या ३५व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धे मध्ये संयुक्ता धुलुगडे ही मिस पुणे फेस्टिव्हलची मानकरी ठरली असून संजना तेजवानी आणि शाझिया शेख या क्रमांक १ व २ रनरप ठरल्या आहेत. (Samyukta Dhulugade is this year’s Miss Pune Festival)

स्पर्धेचे यंदाचे ९ वे वर्ष आहे. दि. २६ सप्टे. रोजी श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या स्पर्धेतील मानकर्यांना पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, यांचा उपस्थितीत मुकुट परिधान करण्यात आला. याशिवाय बेस्ट टॅलेंट – संयुक्ता धुलुगडे, बेस्ट स्माइल – आकांक्षा रोकडे, बेस्ट हेअर – सानिका उत्तेकर, बेस्ट स्कीन- संजना तेजवानी, मिस फिटनेस – मानसा कदम आणि मिस फोटोजेनिक – शाझिया शेख यांची निवड ही करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक दिग्दर्शक योगेश देशपांडे, संगीत दिग्दर्शक विश्वजीत जोशी, अभिनेत्री ऋतुजा शिंदे, अभिनेता स्तवन शिंदे, नृत्य दिगदर्शक ओंकार शिंदे आणि फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र अपूर्वा चव्हाण हे होते. याचे संयोजन सुप्रिया ताम्हाणे यांनी केले होते.

यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, सौ. मीरा कलमाडी, सौ. रमेश बागवे, सौ. अविनाश बागवे, पुणे फेस्टिव्हल उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, दीपाली पांढरे, संयोगिता कुदळे, तेजश्री अडीगे आणि शो डायरेक्टर जुई सुहास आदी उपस्थित होते. बॉयज ३ या नव्या मराठी  चित्रपटाची टीम यावेळी आवर्जून उपस्थित होती. त्यामध्ये अभिनेते पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेंडे, ऋतुजा शिंदे, जुई बेनकडे, रितिका श्रोत्री व दिग्दर्शक विशाल देवरुखकर आणि निर्माता राजेंद्र शिंदे उपस्थित होते. त्याचा ट्रेलर ही यावेळी दाखवण्यात आला . चित्रपटातील गाणी ‘शेपटीवाल्या प्राण्यांची’ देखील येथे प्रथमच प्रदर्शित झाले.

ही स्पर्धा महिलांचे व्यक्तिमत्व आणि सौंदर्य या बरोबरच कुटुंब व समाजाबद्दलचा दृष्टीकोन, प्रेझेंटेशन अशा विविध पातळ्यांवर घेतली जाते. १८ ते २८ वर्षे वयोगटातील ३०० युवतींनी यामध्ये भाग घेतला होता.  त्यातून अंतिम फेरीसाठी २० तरुणींची निवड करण्यात आली. फिटनेस चाचणी, दंतचिकित्सा, नृत्य सराव, फोटो शूट इत्यादी निरनिराळ्या चाचण्या स्पर्धक सामोरे गेले. त्याप्रमाणेच अंडर वॉटर फोटोग्रॅफीचाही यामध्ये समावेश होता.

अंतिम फेरीत ३ भाग होते. पहिल्या फेरीत लेहेंगा, साडी, घाघरा (एथनिक) अशी वेशभूषा होती. सारी पार्टनर रंग वर्षा  यांनी याचे एथनिक डिझाईन केले होते. या तरुणींनी स्वपरीचय करून दिल्यानंतर  दुसऱ्या भागात समूहनृत्य झाले. त्यासाठी पार्टीवेयर टॉप ही वेशभूषा होती. हे वेस्टर्न आउटफिट्स मनस्मी यांचे होते. यातून अंतिम फेरीसाठी 10 तरुणींची निवड करण्यात आली. या अंतिम फेरीसाठी लेबल सोनाली सावंत यांची गाऊन डिझाईन ही वेशभूषा होती. प्रशोत्तरानंतर १० जणींतून तिघींची निवड ज्युरींनी केली. या वेळी रेधून डान्स अकादमीच्या कलावंतांनी  नृत्य सादर केली. त्याच बरोबर माजी मिस पुणे फेस्टिव्हलच्या माजी विजेत्या साक्षी पाटील, आता अभिनेत्री बनलेली पूजा बेरारी आणि सुपर मोडल बनलेल्या फाल्गुनी झेंडे यांनी या प्रसंगी एकत्रित नृत्य सादर केले. अकादमीचे आशुतोष राठोड यांनी स्पर्धकांच्या तसेच अंतिम फेरीसाठी नृत्यरचना सादर केली होती. भावेश भतेजा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. फैशन अँड डांस कोरियोग्राफर, ग्रूमिंग मेंटर, शो डायरेक्टर आणि कॉस्टयूम स्टाइलिस्ट जुई सुहास यांनी सर्व महिला स्पर्धकांची पूर्वतयारी व प्रशिक्षण याचे मार्गदर्शनकरून घेतले होते. ज्वेलरी – बाळासाहेब अमराळे, हेयर एंड मेकअप –  आयएसएएस, क्राऊन – ला देन्सिते, वेन्यू पार्टनर – इंफायनाईट वेरिएबल, ऑफिशियल डिझाईनर – धागा हे होते.

३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन,  पंचशील,  सुमाशिल्प आणि नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत.   भारतफोर्ज,   कुमार रिअॅलीटी,  आहुरा बिल्डर,  बढेकर ग्रुप आणि सिंहगड इन्स्टिट्यूट हे उपप्रायोजक आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *