Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड(Notorious gangster) शरद मोहोळ खून प्रकरणात(Sharad Mohol Murder Case) सराईत गुन्हेगार विठ्ठल शेलार(Vitthal Shelar) व गणेश मारणे(Ganesh Marne) या मुख्य सूत्रधारांसह एकूण 16 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने(Pune Police) अटक केली आहे. सदर गुन्हय़ाची व्याप्ती पाहता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींवर मोक्काअंतर्गत (Mocca) कारवाई केली आहे. संबंधित गुन्हय़ाच्या तपासात चौकशीदरम्यान पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून एकमेकांशी संपर्क केलेल्या 19 हजार 827 ऑडिओ क्लीप(Audio Clip) आढळल्या आहेत. यापैकी साडे दहा हजार क्लीपचे तांत्रिक विश्लेषण करत असताना पुराव्याच्या अनुषंगाने सहा महत्त्वपूर्ण क्लिप मिळाल्या असून नवीन महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. त्याआधारे अभिजीत मानकर(Abhijit Mankar) ( वय 31, रा.दत्तवाडी पुणे ) याला अटक करण्यात आली आहे.
शरद मोहोळ याचा खूनाचा कट आरोपींनी नेमका कशाप्रकारे केला, त्याचे नियोजन कसे केले, याबाबतचे संभाषण पुरावे संबंधित ऑडिओ क्लीपमधून प्राप्त झाले आहे. या गुन्हयातील मुख्य आरोपी असलेल्या सराईत गुन्हेगार विठ्ठल शेलार याने शरद मोहोळ याचे खुनासाठी काही रक्कमदेखील इतर हल्लेखोर आरोपींना दिली असल्याचे तपासात समोर आले आहे. शरद मोहोळ याचा पाच जानेवारी रोजी कोथरुड परिसरात सुतारदरा येथे त्याचा सहकारी मुन्ना पोळेकर व साथीदारांनी जवळून गोळया झाडून खून केला होता. या गुन्हय़ाची घटना सीसीटीव्हीतदेखील कैद झाली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासात दोन वकीलांसह एकूण 16 जणांना आतापर्यंत अटक केलेली आहे. आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आल्यावर त्यांची पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात आली. यादरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावा ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून हाती लागला आहे. संबंधित सर्व ऑडिओ क्लीपचे विश्लेषण करुन पुरावे जमा केले जाणार असल्याची महिती पोलिसांनी दिली आहे.
स्वाती मोहोळ धमकी प्रकरणाचा पोलिसांकडून तपास
गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचे घटनेनंतर त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी पुणे पोलिसांकडे जबाब दिला आहे, की विठ्ठल शेलार व गणेश मारणे या दोन जणांकडून आपल्या जीवाला धोका आहे. त्यानंतर एका अज्ञात इनस्टाग्राम पेजवरुन त्यांना धमकी देणारे मेसेज येऊ लागले आहे. त्यामुळे मोहोळ यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी इन्स्टाग्रामला संबंधित खात्याची माहिती मागवली असून धमकी देणाऱया आरोपीचा शोध सुरु केला आहे.