Mokka on 14 people including drug mafia Lalit Patil

ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह १४ जणांवर मोक्का : ललित पाटील कडून आणखी ५ किलो सोने जप्त

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्यासह राज्यात ड्रग्जचे रॅकेट चालवणाऱ्या १४ जणांवर पुणे पोलिसांनी ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत (मोक्का) कारवाई केल्याने ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहे. (Mokka on 14 people including drug mafia Lalit Patil)

ललित पाटील, अरविंदकुमार लोहरे, अमित शहा उर्फ अमित मंडल, रौफ शेख, भूषण पाटील, अभिषेक बाळकवडे , गोलू सुलतान अन्सारी, प्रज्ञा कांबळे, जिशान शेख, शिवाजी शिंदे, राहुल पंडित, समाधान कांबळे, इम्रान शेख, हरिश्चंद्र पंत या १४ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

२ ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित पाटीलने पलायन केले होते. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता. अखेर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याला बेंगळुरुवर अटक केली होती. ललित पाटील याला ज्यावेळी साकिनाका पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळीदेखील त्याने मोठे खुलासे केले होता. मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असं तो म्हणाला होता. त्याच्या या दाव्यामुळो मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस , येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापक यांच्यावर संशयाची सुई वळली होती.

सासून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली भरती असलेला ललित पाटील हा भूषण पाटील, अरविंदकुमार लोहरे, अभिषेक बलकवडे तसेच इतरांच्या सहाय्याने ड्रग्जचे रॅकेट चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

आणखी पाच किलो सोने जप्त

ललित पाटीलने ससून रुग्णालयातून पलायन केल्यानंतर या प्रकरणाचा खरा उलगडा झाला आणि त्यानंतर पोलिसांसह सर्व यंत्रणा जाग्या झाल्या. त्यानंतरच्या तपासात पुणे पोलिसांनी ललित पाटील याने ड्रग्ज विक्रीच्या पैशातून घेतलेले ३ किलो सोने जप्त केले होते. गुरुवारी (२ नोव्हेंबर) पोलिस ललित पाटील याला नाशिकला घेऊन गेले तेव्हा त्याच्याकडून आणखी ५ किलो सोने जप्त केले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *