ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी देहूतून प्रस्थान ठेवले

पुणे— बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी॥                         सर्व सुखाचें आगरु । बाप रखुमा देवि वरु ॥ लेकुरवाळ्या विठ्ठलामध्ये आपली मायमाऊली शोधणाऱ्या तमाम वारकऱ्यांच्या उपस्थितीत, टाळ-मृदंगाच्या ठेक्यात आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरात जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आषाढी वारीसाठी शनिवारी दुपारी साडे तीन वाजता देहूतून प्रस्थान ठेवले. संपूर्ण देहू नगरी प्रस्थान सोहळ्यामुळे भक्तिचैतन्यात दंग झाली होती. […]

Read More

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी प्रस्थान

पुणे(प्रतिनिधि)–टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी आज (गुरुवारी) देहूमधून प्रस्थान झाले. देहुमध्ये दुपारी अडीच्या सुमारास पालखी पंढरपूरला जाण्यासाठी औपचारिक प्रस्थान ठेवले. 100 वारकर्‍यांच्या उपस्थितीत परंपरा जतन करीत मोठ्या भक्तिभावाने हा सोहळा झाला. यंदाचे हे पालखी सोहळ्याचे 336 वे वर्ष आहे. वारकर्‍यांनी केलेल्या ’ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने अवघा देऊळवाडा तल्लीन होऊन गेला होता. दरम्यान, तुकोबारायांचा […]

Read More