चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? – जयंत पाटील टोला

पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वप्ने पाहण्याचा छंद जडला आहे. त्यातूनच ते वेगवेगळी वक्तव्य करीत असतात. मात्र, महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे. चंद्रकांत पाटलांच्या स्वप्न पाहण्याच्या छंदाबद्दल मी काय बोलू? असा खोचक टोला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. ते पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.   चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकार अधिवेशन का घेत […]

Read More

आदर्शगाव हिवरेबाजारच्या ‘कोरोनामुक्त पॅटर्न’चे पंतप्रधान मोदींकडून कौतुक

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समजून घेतली. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदर्शगाव म्हणून देशपातळीवर नावारूपाला आलेल्या हिवरेबाजारने राबवलेल्या ‘कोरोनामुक्त […]

Read More

पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो, आता करता करणार काय? : का म्हणाले असे अजित पवार

पुणे – कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असतो याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यात कोरोना संदर्भात आढावा बैठकीनंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या फोटोबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी,  “जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो. आता […]

Read More

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हातजोडून केली ही विनंती

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे. असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे […]

Read More

पंतप्रधान मोदींनी केजरीवाल यांना बैठकीत का फटकारले?

नवी दिल्ली- देशात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका ११ राज्यांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दिल्लीतठी सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यावरून सुरु असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री […]

Read More

युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं- संजय राऊत

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात २०१४ साली भाजपचे सरकार आल्यापासून भाजपचा विरोधक असलेला कॉंग्रेस पक्ष संघटना पातळीवर खिळखिळा झाला असून सैरभैर झाल्याचे दिसते आहे. कॉंग्रेस पक्षाकडे युपीएचे नेतृत्व आहे. परंतु, कॉंगेस पक्षच सैरभैर झाल्याने आणि सक्षम नेतृत्व नसल्याने युपीएचा पाहिजे तसा प्रभाव राहिलेला नाही. कॉंग्रेसच्या प्रभारी  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे अध्यक्षपद आहे. […]

Read More