मुंबई-अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी रोज नवनवीन संदर्भ समोर येत आहेत. या रहस्यमय सदर्भामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. काल या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ आल्यानंतर आता त्याचे धागेदोरे अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणातील ड्रग्स प्रकरणाच्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की रिया चक्रवर्ती ज्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅपवर बोलत होती तिचा अंडरवर्ल्डशी थेट संबंध आहे.
ही व्यक्तीचे नाव गौरव आर्य आहे. हे नाव ड्रग्स माफियांच्या अंडरवर्ल्ड रॅकेटशी संबंधित आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्यची बरीच मोठी धेंड ह्राहक आहेत. त्याच्न्ह्या जेव्हा रेव्ह पार्ट्या होतात तेव्हा या व्यक्तीकडूनच ड्रग्जचे व्यवस्था केली जाते. रिया चक्रवर्ती ही सुद्धा त्याची ग्राहक असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिया 2015 पूर्वीपासून त्याला ओळखत होती.
या प्रकरणात रियाने सुशांतला मादक औषधे दिली असल्याचे चर्चा समोर आली आहे. यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) देखील या प्रकरणात तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने एक टीम तयार केली आहे. जी दिल्लीहून मुंबईला रवाना झाली आहे.
या प्रकरणात ‘ड्रग्ज अँगल’ला त्यामुळे आता नवीन वळण लागले आहे रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉट्सअॅप चॅटमुळे अनेक खुलासे झाले आहेत. या गप्पांमध्ये सुशांतसिंग राजपूत ड्रग्सच्या जाळ्यात अडकला होता आणि त्यातून बाहेत पडण्याचे आश्वासनही त्याने दिले होते. हे संदेश रिया चक्रवर्तीने डिलीट केले होते. तपास पथकाने हे संदेश पुन्हा मिळविले आहेत.
या मेसेजवरूनच सुशांतही ड्रग्ज घेत होता असे वाटते. एका अहवालानुसार रिया आणि सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांच्यात 19 जानेवारी 2020 रोजी चर्चा झाली. त्याचवेळी रियाच्या वकिलाने स्पष्ट केले आहे की रियाने कधीही ड्रग्स घेतलेले नाही आणि त्यासाठी कोणत्याही चाचणीसाठी तयार आहे.













