विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या- राजगुरूनगरच्या सभेत जरांगे पाटलांची मागणी


पुणे-मराठा समाजातील एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली. मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाज सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच दूर करणार नाही. तसेच कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार  आज (शुक्रवार) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राजगुरूनगर येथे जाहीर सभेत केला. यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारकडे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण (Maratha reservation) द्यावे, अशी मागणी केली. (Give reservation to the Maratha community by holding a special convention)

पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील शिरोली बायपास जवळील १०० एकर शेतजमिनीवर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेपूर्वी जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको. मराठ्यांचे  बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण ही एकच मागणी आमची आहे. आरक्षण नाही म्हणून आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत. मराठ्यांना आरक्षण म्हटले की यांना कायदा, अभ्यास, समित्या लागतात. मात्र आता सरकारला दिलेला वेळ संपला आहे. आता सुट्टी नाही, आता आरक्षण घ्यायचे .”

जरांगे पाटील पुढे म्हणाले “आता केवळ कायदा पारित करायचा आहे.  समितीला पाच हजार पुरावे मिळाले आहेत. मराठा कुणबी आहेत. त्यामुळे आता राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावे. आम्हाला आडमुठी भुमिका घ्यायची नाही. आडमुठी भुमिका घ्यायची असती तर ४ दिवसांच्या मुदतीवर ठाम राहिलो असतो. ४० दिवसांची मुदत दिलीं नसती”, असे मनोज जरांग पाटील म्हणाले.

अधिक वाचा  पुणे व्यापारी महासंघ करणार लॉकडाऊन बाबत शासनास सहकार्य

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “२४ तारखेपर्यंत कोणालाच काही बोलायचे नाही. सरकारने ठरवले आहे, मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर सोडायचे. त्यामुळे आता शांत राहायचे. २४ तारखेपंर्यत कोणालाच काही उत्तर द्यायचे नाही. वातावरण दुषित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. सर्कलमधील प्रत्येक मराठ्याच्या घरी जा. त्यांना आरक्षण कशासाठी पाहीजे ते सांगा. शांतताच मराठा आरक्षण मिळवून देईल. २२ तारखेला सांगणार २४ तारखेनंतरचे आंदोलन कसे  असणार आहे. मला अजूनही आशा आहे की सरकार २४ तारीख उजडू देणार नाही.” 

या सभेदरम्यान मनोज जरांगे म्हणाले  गेल्या महिना दीड महिन्यात १४ ते १५ मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. यापूर्वी देखील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. त्यांच्या कुटुंबांना मराठा समाज काही कमी पडू देणार नाही. मराठा समाजाचं दु:ख आणि वेदना सहन होत नाही त्यामुळं गावोगावी जाऊन मराठा माता भगिनींचे आशीर्वाद घेत आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. माझ्या समाजाला आई बाप मानतो, समाजाशी गद्दारी करणार नाही. मी एकदा शब्द दिला की बदलत नाही. आपण मोर्चे खूप काढले, सभा घेतल्या पण घराघरातील लोकांनी आरक्षण समजून घेतलं नाही. मोर्चे काढले आणि सभा घेतल्या पण आरक्षण मिळालं नाही. आरक्षण समजून घेणं त्याच्या मुळाशी जाणं महत्त्वाचं होतं, असं मनोज जरांगे म्हणाले.

अधिक वाचा  #मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार जबाबदार - मराठा आरक्षण समिति

इतर लोकांना एका रात्रीतून आरक्षण मिळालं

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, इतर लोकांना एका रात्रीतून आरक्षण मिळालं, मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हटलं की पुरावे द्यावे लागतात. समित्या अभ्यास करतात. आरक्षणासाठी समाजाने मोठा लढा दिलेला आहे. मराठ्यांच्या लेकरांना पुढे येण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. अनेक लोकांचे यासाठी बलिदान गेलेत. त्यामुळं आता सरकारला कोणत्याही स्थितीत आरक्षण द्यावंच लागणार आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

५ हजार पानांचे पुरावे देणार

“मराठा आरक्षणासाठी ५ हजार पानांचे पुरावे देणार आहे. १ पुरावा मिळाला काय १०० मिळाले काय कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. एका दिवसात कायदा पारित होतो. राज्यपालांची परवानगी गेऊन विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन सरकार कायदा पारित करु शकतो.

तरुणाचा गोंधळ घालण्याचा प्रयत्न

या सभेत मनोज जरांगे यांचं भाषण संपल्यानंतर अचानक एक तरूण मंचावर चढला आणि त्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.  हा तरुण प्रचंड आक्रमक दिसत होता. मनोज जरांगेंनी त्याला समजाऊन सांगण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकायला तयार नव्हता. यावेळी मंचावरील इतरांनी त्याला पकडून मंचावरून खाली नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने विरोध केला. यामुळे मंचावर काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर मंचावरील उपस्थित आयोजकांनी या तरुणाला उचलून मंचावरून खाली नेले.

अधिक वाचा  मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही - वळसे पाटील

सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार

“सुनील कावळेंच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. मराठा समाजाच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत. मराठा समाजाचे पोरं हट्ट करायला लागले. याला पूर्णपणे जबाबदार सरकार आहे. जगात आमच्यासाठी शिवनेरीपेक्षा मोठं आणि पवित्र क्षेत्र असूच शकत नाही. मी आज शिवनेरी किल्ल्यावरून जाहिरपणे सांगतो की, आमच्या आत्महत्या होत आहेत याला सरकार जबाबदार आहे. त्यांनी हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

मराठा आंदोलनाची पुढील दिशा २२ ऑक्टोबर रोजी ठरवणार

मराठा आंदोलनाची पुढील दिशा २२ ऑक्टोबर रोजी ठरवणार. सरकार २४ ऑक्टोबर पर्यंत आरक्षण देईल, अशी शक्यता आहे. मराठ्यांचा स्वतंत्र प्रवर्ग करून ५०  टक्क्यांच्या आत आरक्षण द्या अन्यथा कुणबी प्रमाणपत्र द्या. पण स्वतंत्र प्रवर्ग केल्यास एन टी, व्हीजेएनटी प्रमाणे ते टिकले पाहिजे, असे सरकारला सांगत मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केली त्यांना सभेच्या शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love