The DNA of conspiracies is BJP's

ही घटना महाराष्ट्राच्या लौकिकास बाधा आणणारी- गोपाळ दादा तिवारी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- राज्यातील सत्ताप्रमुखांकडुन हाताळल्या जाणाऱ्या संविधानीक प्रक्रियेस नाटक, तमाशा व पोरखेळ संबोधून, लोकशाही प्रक्रिया किती बेजबाबदार व अविवेकीपणाने हाताळली जात असल्याचे निरिक्षण सर्वो.न्यायालयाच्या (५ न्यायमुर्तींच्या) खंडपीठाने नोंदवणे, ही घटना महाराष्ट्राच्या लौकिकास बाधा आणणारी व महाराष्ट्राची नाचक्की करणारी असल्याची टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

अवैध सत्तापालटानंतर सत्ता प्रमुखांवर ‘न्यायालया कडून सर्वाधिक ताशेरे’ ही सत्ताघाऱ्यांची मुजोरी स्पष्ट करते व बेकायदेशीर पणे सत्तेत चिटकुन राहण्याची असंवैधानिक कृती असल्याचेच स्पष्ट होते, अशी कडक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

‘भाजप नेत्यांच्या वक्तव्या प्रमाणे’ मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याच्या मोहीमेत विरोधी-पक्ष संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांत, किती वेळा महाराष्ट्राच्या हिताचा बळी देणार का? असा सवालही तिवारी यांनी केला.

काही महीन्यांपुर्वीच्, महाराष्ट्रातील दंगली बाबत ‘उच्च न्यायालयाने’ शिंदे – फडणवीस सरकारला (नपुसंक म्हणुन) चपराक लगावली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे – फडणवीसांच्या शपथविधीवर व राज्यपाल कोश्यारींच्या भुमिकेवर ही ताशेरे ओढले.

रश्मी शुक्ला पोलीस अघिकाऱ्यांची फोन टॅपिंग केस मागे घेण्या विषयी, तसेच ड्रग माफीया फरारी ललीत पाटील विषयी, देखील न्यायालयाने फटकारले. ‘मणिपूर प्रकरणी’ सर्वोच्च न्यायालयाने केंद्रास तंबी दिल्यावर राज्यातील भाजप नेते भातखळकरांनी आगंतुकपणे ‘सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर’ अवमानकारक वक्तव्य करुन मुजोरी वृत्तीचे दर्शन घडवले होते.

जनतेच्या सुरक्षेप्रती व कर्तव्याप्रती बेपर्वा व बेधुंद असलेल्या भाजप सत्ताधाऱ्यांवर कायदा सुव्यवस्थे विषयी न्यायालयास वारंवार ताशेरे ओढावे लागणे व कर्तव्याप्रती जाणीव करुन देणे ही बाब ‘स्वातंत्र्याच्या अमृत काळात’ भाजपसाठी लाजीरवाणी ठरत असल्याची टिका देखील काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *