सुनेत्रा पवार राज्यसभेवर : भुजबळांची नाराजी

Sunetra Pawar in Rajya Sabha
Sunetra Pawar in Rajya Sabha

पुणे(प्रतिनिधि)—बारामती लोकसभा मतदार संघातून  सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी आज(गुरुवार) विधानभवनात राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज न भरल्याने सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

सुनेत्रा पवार अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते उपस्थित होते, मात्र  महायुतीच्या उमेदवारांची यावेळी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभव झालेल्या  सुनेत्रा पवारांनी आता संसदेत मागच्या दरवाजानं एन्ट्री घेतली आहे. राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार हे जवळपास आधीच निश्चित झालं होतं. आज विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला. दरम्यान यावेळी अजित पवार उपस्थित होते. शिवाय सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळही उपस्थित होते. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी छगन भुजबळ, प्रफुल पटेलही इच्छुक होते, मात्र उमेदवारीची माळ सुनेत्रा पवारांच्या गळ्यात पडली आहे. 

अधिक वाचा  कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स - मेधा पाटकर

छगन भुजबळ नाराज?

बुधवारी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे  कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि आपली भूमिका मांडण्यास सांगितली होती. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी प्रफुल्ल  पटेलांच्या प्रस्तावाचं समर्थन केलं. मात्र राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबन यांनी या प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली. मी आणि परांजपे या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितलं. भुजबळ राज्यसभेसाठी इच्छूक होते, मात्र त्यांचा नावाची शिफारस करण्यात आली नव्हती, यामुळे भुजबळ नाराज होते. मी राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक होतो. पण पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला आहे. पार्टीत वरिष्ठ निर्णय घेतात. पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करावे लागेल, असं म्हणज भुजबळांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.

नक्की काय घडलं?

अधिक वाचा  भूमिकेला पुढे घेऊन जाणारी पत्रकारिता राहिली नाही- विजय चोरमारे

प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार या विषयी कमालीची उत्सुकता होती, ती उत्सुकता आता संपली, अखेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राज्यसभेवर जातील.  मागच्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस कडून राज्यसभेवर कोण जाणार याविषयी मोठ्या चर्चा होत होत्या, यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक जणांची नावे चर्चेत होती, मात्र  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरापर्यंत अजित पवारांच्या निवासस्थानी म्हणजेच देवगिरीवर महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी हे सर्वजण इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. मात्र महायुतीतील मतांची विभाजणी टाळण्याकरता  सुनेत्रा परावांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे,

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love