जरांगेसाहेब आरक्षण घेतल्याशिवाय हटू नका…. : मराठा आरक्षण आंदोलकाची आत्महत्या

Suicide of a Maratha reservation protestor
Suicide of a Maratha reservation protestor

पुणे(प्रतिनिधी)– मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर रस्त्यावरील वाघोली भागातील एका कंपनीच्या आवारात सुरक्षा रक्षक असलेल्या मराठा आरक्षण आंदोलकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रसाद देठे (रा. वाघोली, मूळ रा. बार्शी) असे आत्महत्या केलेल्या आंदोलकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी समाजमाध्यमात व्यक्त होऊन मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे देठे यांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे यांच्या नावाने त्यांनी चिठ्ठी (Sucide Note) लिहिली असून, आरक्षण मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत ‘जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका’, असे त्यामध्ये म्हटले आहे.

देठे मूळचे बार्शी तालुक्मयातील रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी ते कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. वाघोली भागातील एका खासगी कंपनीत ते सुरक्षारक्षक होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. मुलगा द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत. मंगळवारी (१८ जून) ते कामावरून घरी आले. त्यानंतर देठे समाजमाध्यमात व्यक्त झाले. मराठा समाजातील तरुणांच्या व्यथा, बेरोजगारी, तसेच अन्य समस्यांविषयी त्यांनी समाजमाध्यमात व्यथा मांडली. त्यानंतर त्यांनी कंपनीच्या आवारातील टेम्पोच्या लोखंडी गजाला डोक्मयाला गुंडाळण्याचे कापड (गमछा) बांधून गळफास घेतला.

अधिक वाचा  एक राजा बिनडोक तर दुसऱ्याचे राजाचे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर-प्रकाश आंबेडकर

 जरांगेसाहेब आरक्षण घेतल्याशिवाय हटू नका….

आत्महत्या करण्यापूर्वी प्रसाद देठे यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. जयोस्तु मराठा. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, मुंढे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी स्वखुशीने आत्महत्या करत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. माझे तुम्हाला पटणार नाही. मी पूर्ण हताश झालोय. मला माफ करा, असे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love