न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी आणि सासूवर केला पिस्तूलातून गोळीबार


पुणे-पती-पत्नीमध्ये पोटगीवरुन सुरु असलेल्या वादातून न्यायालयाच्या आवारातच पतीने पत्नी आणि सासूवर पिस्तूलातून गोळीबार केला. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोराने पोलिस आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे.

दीपक पांडुरंग ढवळे (४५, रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) असे हल्लेखोराचे नाव आहे. त्याने केलेल्या गोळीबारात पत्नी मंजुळा दीपक ढवळे (३५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दीपक याची सासू तुळसाबाई रंगनाथ झांबरे (५५) ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे.

संबंधित लोकं हे पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील असून त्यांची आज शिरूर न्यायालयात पोटगीच्या दाव्याला निकाल होता. त्या निकालासाठीच ढवळे आणि झांबरे कुटुंबीय शिरूरच्या कोर्टात आले होते. मंजुळा ढवळे हिने पतीविरोधात पोटगीचा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी शिरूरमध्ये सुरू होती, त्याचा आज निकाल होता.

अधिक वाचा  आणि जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांना रडू कोसळलं...

या निकालासाठी दीपक आपल्या भावासह आला होता, तर मंजुळा ही आपल्या आई तुळसाबाई यांच्याबरोबर न्यायालयात आले हेाते. सुरुवातीला या तिघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर हल्लेखोराने कमरेचा पिस्तूल काढून फायरिंग केले. यामध्ये पत्नी मंजुळा हिचा दोन गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू झाला, तर सासू तुळसाबाई ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटगीच्या दाव्याचा निकाल आज शिरूर कोर्टात होता. मात्र, त्यापूर्वीच दीपक याने पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोर दीपक पांडुरंग ढवळे याला ताब्यात घेतले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love