पत्नी आणि तिच्या माहेरच्या माणसांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या


पुणे—पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी भागात ही घटना घडली आहे.

समीर नाईक (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी समीर यांचे वडील निवृत्ती नाईक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. समीर यांच्या पत्नी उषा नाईक हिच्यासह सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सरसाबाई पंढरकर,  रामचंद्र पंढरकर, मालसिंग आढाव यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर नाईक यांचा उषा या महिलेशी विवाह झाला होता. त्यांना एक १२  वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून उषा आणि तिच्या माहेरचे लोक समीरकडे वारंवार पैशांची मागणी करायचे आणि त्यावरून त्यांच्यामध्ये अनेक वेळा वाद देखील झाले. काही रक्कम दिल्यानंतर सुद्धा उषा आणि तिच्या नातेवाईकांनी समीरकडे वारंवार आणखी पैश्याची मागणी करायचे. या गोष्टीचा मानसिक त्रास समीरला होऊ लागला आणि त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  बीएसएनएल-४ जी सेवा खाजगी कंपन्यांच्या दबावाखाली बंदच : मोदी सरकारने आत्मनिर्भरतेचे कथित ढोल पिटत, देशातील जनतेस मुर्ख बनविले आहे- गोपाळदादा तिवारी