दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी समुपदेशक आणि विषय तज्ञांची नियुक्ती


पुणे– दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना प्रश्‍नोत्तरातून संवादाद्वारे मार्गदर्शन व समपुदेशन करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्य शासनाने अनुक्रमे 426 तज्ज्ञ समुपदेशक आणि 596 विषय तज्ज्ञांची नियुक्‍ती केली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील शंकाचे निरसन करणे शक्‍य होणार आहे.

दहावी व बारावीच्या परीक्षा एप्रिलपासून सुरू होत आहे. करोनामुळे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तसेच, अभ्यासक्रमातही कपात केली आहे. मात्र, सर्वच विद्यार्थ्यांना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत समपुदेशन करण्यात येणार आहे. तसेच, त्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी व शंकाचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून प्रश्‍नोत्तरातून संवाद साधले जाणार आहे. त्यासाठी 696 शिक्षकांची नियुक्‍ती केली आहे. जिल्हानिहाय शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.

अधिक वाचा  ब्रिकईटीसीचा पुण्यातील जेएसपीएम आणि टीएसएसएमम शाळांसोबत सामंजस्य करार

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत भीती व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या शिक्षकांची भूमिका राहणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या संवादातून विद्यार्थ्यांनी आपले प्रश्‍न सोडवू शकता. जेणेकरून विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेसाठी आत्मविश्‍वासाने सामोरे जाईल, अशी आशा आहे, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले. या शिक्षकांची यादी maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love