अरविंद एज्युकेशन सोसायटीत प्रवेश उत्सवाने विद्यार्थी भारावले : कोरोनाचे नियम पाळत शुक्रवारी शाळा सुरू


पिंपरी(प्रतिनिधी): तब्बल दीड वर्षानंतर जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल व भारतीय विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे आनंदाने व उत्साहाने स्वागत करण्यात आले. या सुखद व अनपेक्षित स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

 सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे,  सांगवीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, रवींद्र मंडपे, सुदाम ढोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बांठिया, प्रिया मेनन, आशा घोरपडे, नीलम पवार, पश्चिम सांगवी जेष्ठ नागरिक संघाचे ईश्वर चौधरी, अशोक चव्हाण, चंद्रकांत चोपडे, संतोष चव्हाण, भटू शिंदे, उदय फडतरे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  इंद्रायनी नदी पुन्हा फेसाळली

अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने सारे वातावरण भारून गेले होते. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करीत कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन करीत होते. ‘पुन्हा एकदा घंटा वाजली – शाळा भरली’, ‘कोरोनाला जाऊ द्या – आम्हाला शाळेत येऊ द्या’, ‘शाळेत नियम पाळू – कोरोनाला टाळू’, ‘शिक्षण घेऊ हसत हसत – कोरोना जाईल पळत पळत’, ‘हम बच्चों ने ठाना है – कोरोना को हराना है’ अशा प्रकारे वातावरण भारावून गेले होते. 

 या विद्यार्थ्यांमधील उत्साह बघून आजचा दिवस म्हणजे ‘प्रवेश उत्सव’ असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. तसेच दीड वर्षाच्या कालावधीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत काळजी घेण्याचे आवाहन केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love