जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कवितांनी रंगला ‘आयुष्यावर बोलु काही’: डॉ. सलील कुलकर्णी यांचा कोथरूड गणेश फेस्टिवलमध्ये विशेष सन्मान

Special honor for Salil Kulkarni in Kothrud Ganesh Festival
Special honor for Salil Kulkarni in Kothrud Ganesh Festival

पुणे- आयुष्यातील प्रत्येक सुख दुःखाच्या क्षणांवर फुंकर घालत जगण्याचे पैलू उलगडणाऱ्या कविता, प्रेम कविता, बालगीते सादर करून रसिक प्रेक्षकांच्या कविमनाला साद घालणाऱ्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी संदीप खरे (sandip Khare) आणि ख्यातनाम संगीतकार, गायक सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांनी ‘आयुष्यावर बोलु काही’ (Ayushyavar Bolu Kahi) हा बहारदार कार्यक्रम कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये सादर केला. (Special honor for Dr.Salil Kulkarni in Kothrud Ganesh Festival)

यावेळी डॉ. सलील कुलकर्णी यांना “एकदा काय झाले” या चित्रपटासाठी राष्ट्रपती पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर इ. मान्यवर उपस्थित होते. यानंतर ‘आयुष्यावर बोलू काही’चा प्रयोग सादर करण्यात आला. कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह श्रोत्यांनी भरगच्च भरले होते. त्यांच्या सर्व गाण्याला टाळ्या आणि शिट्यांनी दाद दिली. ’अग्गोबाई ढग्गोबाई’ या कवितांवर लहान मुला-मुलींनी ठेका धरत उपस्थित पालकांचे लक्ष वेधले.

अधिक वाचा  राजेश पांडे यांची भाजपचे पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती

आम्ही कोथरूडकर’तर्फे आयोजित व ‘संवाद पुणे’ निर्मित कोथरूड गणेश फेस्टिव्हलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रसिद्ध कवी संदीप खरे आणि संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ यांचा कार्यक्रम झाला. यावेळी अदित्य आठल्ये यांनी तबल्यावर, राधिका अंतुरकर यांनी गिटारवर त्यांना साथसंगत दिली.

यावेळी सर्व कलाकारांचा सत्कार फेस्टिव्हलच्या आयोजकांच्या हस्ते करण्यात आला. कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजक, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दीपक मानकर, ‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅजड. मंदार जोशी व महाराष्ट्र प्रदेश युवा सेनेचे सचीव किरण साळी, मंजुश्री संदीप खर्डेकर आणि अॅरड अर्चिता मंदार जोशी यांच्यासह आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  अभाविपचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

’जरा चुकीचे, जरा बरोबर, बोलू काही, चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही, या कविते कार्यक्रमांची सुरुवात झाली. टाळ्यांचा कडकडाटाने श्रोत्यांनी दाद दिली.

’दमलेल्या बाबां’ची कहाणी सांगत संदीप खरे यांच्या कवितांना सलील कुलकर्णी यांनी स्वरसाज चढवत रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवला. ’अग्गोबाई ढग्गोबाई’ या कवितांवर लहान मुला-मुलींनी ठेका धरत उपस्थित पालकांचे लक्ष वेधले. लहान मुलांच्या चेहर्यागवर खरा आनंद दडलेला असतो. त्यांच्या समोर गायले की लगेच आम्ही सादर केलेले गीत कीती चांगले चांगले झाले हे त्यांच्यावरुन आम्हाला कळते, असे यावेळी सलील कुलकर्णी यांनी सांगितले.

कोण कोण वर्गात हात करा वर, एक  होता मासा लाल झाला त्याचा घसा डॉक्टर म्हणाले कोरड्या पाण्यात जाऊन बसा, मी पप्पाचा फोन केला राव, आजोबा म्हणात खंडेराव, कृष्ण हे बालगीते सादर करुन लहानग्याबरोबरच मोठ्यांची  मने या गायकांनी जिंकली.

अधिक वाचा  ‘दो धागे श्रीराम के लिए': अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्यामध्ये नागरिकांना प्रत्यक्ष सहभागाची संधी

 मन तळ्यात, मन मळ्यात, नसतेस जेव्हा घरी तु, मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, जपत किनारा सोडून नामंजूर या कविता सादर करत कवी संदीप खरे आणि गायक सलील कुलकर्णी यांनी रसिकावर मोहिनी घातली. त्याचबरोबर रेकोर्डिंगच्यावेळी अनेक घडलेले किस्से सांगितले. उत्तरोत्तर कार्यक्रम रंगत गेला.

गायक शुंभकर कुलकर्णी यानेदेखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी त्याने ‘ऐकटी ऐकटी घाबरलीस ना’ हे गीत सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सागरा प्राण तळमळला या गीताने कार्यक्रमांची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले. तर अॅीड. मंदार जोशी यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love