पुणे–मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकामध्ये ‘भाजपशी युती हाच पर्याय’ असा संपादकीय लेख लिहिल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, “पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल”, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मराठा सेवा संघाच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून आजपर्यंत केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप रडारवर असताना, पुरुषोत्तम खेडेकर यांनी थेट भाजपशी युती करण्याचं भाष्य केल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना संभाजी ब्रिगेडच्या बदलत्या भूमिकेवर भाष्य केलं. पुरुषोत्तम खेडेकर यांनी ‘मराठा मार्ग’ या मासिकाच्या संपादकीयमध्ये लेख लिहिला आहे. खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. पण आम्ही अद्याप कोणताही निर्णयापर्यंत आलेलो नाही. खेडेकरांची नेमकी ऑफर काय आहे ते पाहू. चर्चा करु, त्यानंतर याबाबतचा निर्णय घेऊ” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संभाजी ब्रिगेडच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. दरेकर म्हणाले, “संभाजी ब्रिगेडने असं वक्तव केलं असेल तर त्याचं स्वागतच असेल. महाविकास आघाडीला आरक्षण राखता आलं नाही हे मराठा समाजातील लोकांना समजलं आहे. निवडणुका लढावाव्या की नाही हे वरच्या पातळीवर निर्णय घेतील. मराठा समाजातील अजून किती बळी या सरकारला हवे आहेत हा माझा प्रश्न आहे . सरकारला जाग येत नसेल तर दुर्दैव आहे.