चोराचा पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार


पुणे-नाशिकच्या जेलमधून बाहेर आलेला गुन्हेगार पुण्यात चोरी करत असताना त्याचा  पाठलाग करणाऱ्या तरुणावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पण, जखमी अवस्थेत देखील त्या धाडसी तरुणाने त्याला पकडले आहे. मध्यवस्तीत भरदिवसा हा थरार घडला आहे.

अवेज सलीम अन्सारी (23) हा जखमी झाला आहे. पोलिसांनी विठ्ठल वामन बोळे (रा. हिंगणे मळा, जळगाव) याला पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब राष्ट्रभूषण येथील खडकमाळ येथील एका इमारतीत राहतो. दरम्यान दुपारी जेवण केल्यानंतर ते टेरेसला जातात. त्यानुसार टेरेसला गेले होते. घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी विठ्ठल हा घरात शिरला आणि त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  अहमदनगर ओळखले जाणार 'अहिल्यानगर' म्हणून : मुख्यमंत्र्यांची घोषणा

चोरी केल्यानंतर तो खाली येत होता. खाली येत असताना त्याला अवेजने पाहिले आणि पायऱ्यांवर त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी त्याने अवेजवर गोळीबार केला. एक गोळी त्याला हाताला लागली. तरीही त्याने बोळेला पकडले. भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love