नागपूर –शरद पवार यांनी त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षाचा ‘शपथनामा’ नावाचा जाहीरनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते जनतेला मूर्ख समजत आहेत. शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसण्याचा नामा आहे असा आरोपही त्यांनी केला.
कोराडी (नागपूर) येथे ते माध्यमांशी संवाद साधत होते, बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांच्या या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही. जेव्हा-जेव्हा शरद पवार सत्तेवर होते तेव्हा-तेव्हा स्वतःच राजकारण, स्वतःच्या लोकांच राजकारण सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता यासाठी केले. या महाराष्ट्रच कधीच भले झाले नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृवात्वात जो जाहीरनामा, वचननामा जाहीर केला आहे, त्यातून राष्ट्र कल्याण आणि देश कल्याण साधले जाणार आहे.
उबाठाचा ‘वचननामा’ नसून ‘यूटर्ननामा’
नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे.
ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांना कविडीही दिली नाही, फक्त घरात बसून राहिले ते म्हणतायत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीच्या ‘यूर्टननाम्या‘ला भुलणार नाही.
• इंडी आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधी यांनी असे म्हटल आहे की हिंदूची संपत्ती आम्ही ओढवू आणि मताचा लांघुलचालनाकरिता दुसऱ्या लोकांना देऊ.
• त्यामुळे हिंदूंच्या मागे हिंदूंचा नाश करण्याकरिता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरिता, सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा ही जशी उदयनिधी स्टालिन यांनी केली आहे ती भाषा उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी करत आहेत.
• काँग्रेसच्या वचन नामामध्ये सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे, त्या वचन नामाचा जो शेवट आहे हा हिंदू समाजाविरुद्ध आहे..
• त्यामुळे काँग्रेसचा आणि शरद पवार यांचा वचननामा हा महाराष्ट्र विरोधी,देश विरोधी, हिंदू विरोधी आहे आणि या देशाला संपवणारा आहे
• संविधान संपवणार अशी भाषा, हा नरेटिव्ह, हा जो मागासवर्गीय भागामध्ये काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत आहेत
• खरे तर यांनी समाजाची माफी मागितली पाहिजे,
डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची माफी मागितली पाहिजे
• मोदीच्या विकसित भारताचा 2024 ते 2029 चा वचननामा हा महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी 14 एप्रिलला दिला आहे
• संविधान हातात घेऊन नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्तम भारत बनवण्याकरिता निघाले आहेत, आणि हे खोटारडे (विरोधक) मागासवर्गीय आयोगाला सांगत आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान संपवणार आहे
• त्यामुळे हे चुकीच सांगून जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत, मागासवर्गीय जनता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सन्मान करणारे आम्ही लोक कधीही या काँग्रेसच्या आणि इंडी आघाडीच्या प्रचाराला बळी पडणार नाही.
एकनाथ खडसे यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेशाला कोणीही आडकाठी केली नाही, केंद्रानेच जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आडकाठी करत नाही. पक्ष प्रवेशाबद्दलची जी केंद्रीय समिती आहे ती अंतिम निर्णय घेते त्यानंतर समितीची बैठक झाल्यावर मग पक्ष प्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले. .