पुणे- सन २००४ मध्ये सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे गृहमंत्री होते. वाझे यांनी त्याबाबत ३० नोव्हेंबर २००७ पुनर्रयाचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला तो स्वीकारण्यात आला. त्यावेळी गृहमंत्री राष्ट्रवादीचे होते. मग आता त्याच वाझे मध्ये असं काय सापडलं की त्यासाठी कमिटी नेमली गेली आणि त्या कमिटीचा अहवाल स्विकारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी सही केली? असा सवाल करीत याचं उत्तर शरद पावर यांनी द्यावं अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.
वाझे यांना पुन्हा रुजू करून घेतल्यानंतर त्यांना ७ महिन्यात बडतर्फ करण्यात आले. तुम्ही निर्णय घेतल्यानंतर त्यांना बडतर्फ का करावं लागलं याचं उत्तर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी द्यावं असे म्हणत एक एपीआय क्राइम ब्रँचची गाडी घेऊन फिरतो आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग तीन दिवस त्यांच्याशी गुप्तगू करतात. पोलीस आयुक्त एपीआयशी गुप्तगू करण्याचे एक तरी उदाहरण शरद पवार यांनी दाखवावे असेही ते म्हणाले.