मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांचे निधन

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे–मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मराठी प्रकाशक संघाचे माजी कार्यवाह सुनील मेहता यांचे बुधवारी अल्पशा आजाराने दुपारी चार वाजता निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. उद्या (गुरुवारी) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, बहिण असा पाfरवार आहे.

 किडनी स्टोनवरील उपचारासाठी त्यांना पूना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते पण उपचारादरम्यान त्यांचे एकेक अवयव निकामी होत गेले. दोन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

 प्रकाशन व्यवसायाला आधुनिक रुप देण्यार्‍या प्रकाशकांमध्ये त्यांचे नाव आघाडीने घेतले जाते. आजच्या अनेक ख्यातनाम लेखकांना त्यांनीच आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली. त्यांनी अनेक विषयांना हात घालणारी दर्जेदार अशा पुस्तकांची निर्मिती करण्यावर सातत्याने भर दिला होता.

 1976 साली सुरु केलेल्या मेहता पाfब्लशिंग हाऊस सुरु झाले. सुनील मेहता यांनी 1986 साली वडील अनिल मेहता यांच्याकडून व्यवसायाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी अगदी लहान वयापासून मेहता पाfब्लशिंग हाऊसचा पाया आणि वाढ पाहिली आणि काम शिकून घेतले. तसेच वडिलांकडून व्यवसायाची दोरी आपल्या हाती घेतली. त्यांच्या नेतृlवाखाली कंपनीची ताकद वाढली आहे. मराठीत परदेशी आणि प्रादेशिक पुस्तकांचे भाषांतर आणि प्रकाशन केले. ई-बुक सेवाहि त्यांनी सुरू केली.

 मराठीतील दर्जेदार पुस्तकांच्या प्रकाशनासोबतच विविध भाषांमधील पुस्तकांचे अनुवाद मराठीत आणणार्‍या सुनील मेहता यांनी संस्थेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले होते. अनेक आंतरराष्ट्रीय, नामांकित जेफ्री आर्चर, मायकल क्रायटन, फ्रेडरिक फोरसाइथ, रॉबिन कुक, ऍलिस्टर मॅक्लीन, जॉन ग्रिशॅम, इयान फ्लेमिंग, डॅन ब्राऊन, डेबोरा एलिस, ली चाइल्ड झुcपा लाहिरी यांचे साहित्य मराठीत आणण्यात सुनील मेहता यांचे मोठे योगदान आहे. तर तस्लिमा नासरीन, सुधा मूर्ती, अरुण शौरी, खुशवंत सिंग, चेतन भगत, एस. एल. भैरप्पा, शिवराम कारंथ, गुलजार, दीप्ती नवल, अरुंधती रॉय, ओशो, किरण बेदी अशा लेखकांचे साहित्य त्यांनी मराठीत नावारूपाला आणलं.

 मराठीतील वि. स. खांडेकर, रणजित देसाई, व. पु. काळे. विश्वास पाटील, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, आनंद यादव आणि व्यंकटेश माडगुळकर अशा दिग्गज लेखकांचे साहित्य दर्जेदार रुपात मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मेहता यांनी केले. फ्रॅकफर्ट येथील आंतरराष्ट्रीय बुकफेअरमध्ये सहभाग नोंदवून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी मराठी प्रकाशन विश्वाचे प्रतिनिधित्व केले. प्रकाशन व्यवसायातील नवे आयाम आत्मसात करण्यात मेहता पब्लाfशिंग हाऊस आघाडीवर आहे. सुनील मेहता यांनी मराठीत सर्वप्रथम इ-बुक्सचा प्रयोग यशस्वीरित्या राबवला. मेहता पाfब्लशिंग हाऊसची दीडहजारहून अधिक पुस्तके इ-बुक स्वरूपात उपलब्ध आहेत. नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात त्यांनी ‘मेहता साहित्योत्सव’चा अभिनव प्रयोग राबविला, ज्यात साहिित्यक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र स्टॉल घेऊन वाचक आणि लेखकांचा संवाद घडवण्यात आला. अनेक प्रकाशन सोहळे आयोजित करण्यात आले. 2012 मध्ये नॉर्वे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पाfरषदेत एकमेव मराठी प्रकाशक म्हणून मेहता यांनी प्रतिनिधित्व केले होते.

 उद्या सकाळी 9 ते 9.30 च्यादरम्यान मेहता पाfब्लशिंग हाऊसच्या कार्यालयात त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *