My transport department is responsible for 40 percent of the country's pollution ​

देशातील 40 टक्के प्रदुषणाला माझे वाहतूक खाते जबाबदार – नितीन गडकरी

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

Nitin Gadkari | International Sugar Conference : आपल्या देशाला आजही 85 टक्के इंधन (Fuel) आयात(Import) करावे लागत असून त्यासोबतीने प्रदुषणाची(Pollution) समस्या वाढत आहे. देशातील 40 टक्के प्रदुषणाला माझे वाहतूक खाते(Transport Department) जबाबदार आहे असे विधान केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी केले.(My transport department is responsible for 40 percent of the country’s pollution)

मांजरी(Manjari)  येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट(Vasantdada Sugar Institute) येथे आयोजित तिसऱया आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत( International Sugar Conference )ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) होते. गडकरी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.   

गडकरी म्हणाले, ग्रीन हायड्रोजन सारखे जैविक इंधन काळाची गरज असून साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर दिला पाहिजे. पेट्रोल डिझेल सारख्या पारंपरिक इंधनाचा योग्य पर्याय म्हणून हे इंधन पुढे आले आहे. भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे आपल्याला परवडणारे नाही. म्हणूनच साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर अधिक भर देण्याची गरज आहे. साखर उद्योगच नव्हे तर देशभरातील कृषी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन सारखे इंधन तयार करण्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. 

शेतीचा विकास झाल्याने अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला असला तरी त्याचा अंतिम फायदा शेतकऱयांना होताना दिसत नाही. ग्राहकांच्या दृष्टीने शेतीमालाचे दर फार वाढवता येत नाहीत. त्यामुळे शेतकऱयांना हमीभाव मिळत नसल्याची खंतही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. 

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या सात्यतपूर्ण कामामुळे साखर उत्पादन वाढून शेतीचा विकास झाला आहे. मी विदर्भातील शेतकरी आहे. तिथे ऊसाची शेती करणे अवघड आहे. तिथेही ही संस्था सुरू झाल्याने विदर्भातील ऊस शेती वाढत आहे, असे गौरवोद्वगार त्यांनी काढले. 

पवार म्हणाले, जागतिक हवामान बदलाचा साखर उद्योगावर परिणाम होत आहे. जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान आणि आण्विक जीवशास्त्र यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अध्घ्कि चालना देण्याची गरज आहे. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *