जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन: वस्ताद पाटील ते महाभारतातील धृतराष्ट्र अशा विविध भूमिका साकारल्या


मुंबई-  रंगभूमी असो की चित्रपट, आपल्या दमदार, कसदार आणि चतु:रस्त्र अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

रवी पटवर्धन यांचे व्यक्तिमत्व भारदस्त होते. त्यांच्या झुपकेदार मिश्या हे त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाचा एक वैशिष्ठ्य होते. त्यामुळे त्यांना गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश अशा किंवा खलनायकाच्या भूमिका मिळायच्या परंतु त्यांनी या भूमिकांबरोबरच रंगभूमीवर विविध पारकरच्या भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांची माने जिंकली. त्यांनी २०० हून अधिक चित्रपटाट आणि १५० हून अधिक नाटकात विविध भूमिका साकारल्या. ;अगबाई, सासूबाई’ ही त्यांची शेवटची मालिका यातील त्यांची कडक भूमिकाही प्रेक्षकांना भावली.

अधिक वाचा  कोरोनावरील उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात टास्क फोर्स: उद्धव ठाकरे

आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेऊन त्यावर मात केली. एवढेच नव्हे तर या शास्त्राचा  अभ्यास करून स्वत:च्या अनेक व्याधींवर मात केली.

दरम्यान, दुरदर्शनवरील वस्ताद पाटील असो किंवा महाभारतातील धृतराष्ट्र असो, रवी पटवर्धन यांनी प्रत्येक लहान मोठ्या भूमिकांमध्ये अक्षरशः प्राण ओतला. असा चतुरस्त्र कलाकार आज आपल्यातून गेल्यानं मोठी हानी झाली,’  अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर ट्वीट करून दिली आहे.

रवी पटवर्धन हे आजच्या कलाकारांसमोर आदर्श आहेत. एकाच साच्याच्या भूमिका न करता त्यांनी वैविध्य ठेवले आणि म्हणूनच त्यांची ओळख टिकून राहिली. सिने नाट्य सृष्टीतील एक मराठमोळे भारदस्त आणि ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून गेले,’  असे ठाकरे यांनी , म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love