बीएसजीच्या सहकार्यातून पुण्यातील एचडीएफसी शाळेत उभारणार एसडीजी क्लब


पुणे- शाश्वत विकासाची मूलभूत तत्वे  लहानपणापासूनच  विद्यार्थ्यांमध्ये  रुजू व्हावी यासाठी हडपसर येथील मगरपट्टा सिटी जवळील एचडीएफसी शाळेने बीएसजीच्या सहकार्यातून एसडीजी क्लब या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली आहे.

सामान्य लोकांमधील जागरूकता वाढवून एक चांगले जग निर्माण करण्याच्या संकल्पनेतून बीएसजीचे सदस्य २०३० च्या दिशेने: शाश्वत मानवी वर्तनाद्वारे एसडीजी साध्य करणे यासाठी बीएसजी फॉर एसडीजी उपक्रमाद्वारे अनेक कार्यक्रमांना चालना देऊन २०३० पर्यंत एसडीजी (शाश्वत विकास उद्दिष्टे) साध्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.बीएसजी ही सोका गक्काई इंटरनॅशनलशी संलग्न भारतीय संस्था आहे. जी शांततापूर्ण, न्याय्य आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीसाठी व्यक्ती, नागरी समाज आणि राष्ट्रसंघ यांचे एकमेकांतील संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करते.

अधिक वाचा  स्वाधीनतेपासून संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाताना स्वावलंबी भारतात रोजगाराच्या संधी वाढणे आवश्यक

आज जगाला तरुणांनी एकजुटीने निर्माण होण्याची गरज आहे. ‘बीएसजी फॉर एसडीजी’ उपक्रमाचा एक भाग म्हणून बीएसजीने वेगवेगळ्या संस्थांमध्ये एसडीजी क्लब्स स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थांमधील विद्यार्थ्यांना एकत्रपणे एसडीजीबद्दल जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून, ‘शाश्वत मानवी वर्तना’च्या माध्यमातून दररोज एसडीजीमध्ये योगदान देण्यासाठी उपाय तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यातून शाश्वततेची एक संस्कृती निर्माण होईल.     

बीएसजीचे अध्यक्ष विशेष गुप्ता म्हणाले  की सामान्य व्यक्ती म्हणून एसडीजी साध्य करण्यासाठी आपण आपली जाणीव वाढवली पाहिजे आणि पर्यावरणाबद्दल विचार करण्याच्या आपल्या मूलभूत पद्धती बदलल्या पाहिजेत, यावर आमचा विश्वास आहे. या सुधारणांना केवळ आंतरिक प्रेरणा आणि सखोल वचनबद्धता यांच्या द्वारेच चालना दिली जाऊ शकते. ती नंतर आपल्या ‘शाश्वत मानवी वर्तनात’ प्रतिबिंबित होईल.

अधिक वाचा  झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर- मुरलीधर मोहोळ

एचडीएफसी  प्राचार्या डॉ. अमृता प्रभू म्हणाल्या की “एक जागरूक आणि जाणीव असलेली संस्था म्हणून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एसडीजी २०३० बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी नेहमीच कार्यक्रम घेत असतो. एसडीजी क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये बीएसजी हे आमचे ज्ञानसंपदा देणारे आणि सर्वांगीण मार्गदर्शक असतील. या औपचारिक स्थापनेमुळे या जागतिक चळवळीसाठी आमचे विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक हे आमचे मौल्यवान मानवी संसाधन देताना शाळा म्हणून आम्हाला सक्षम आणि उत्साही झाल्यासारखे वाटते.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love