बाप्पा हाय टेक होतोय : पेरुगेट चौक मित्र मंडळ घडविणार २ डी अॅनिमेशन देख्याव्यातून नेत्रसुखद अनोखी जंगल सफर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या मूळ हेतूसाठी उत्सव सुरू केला होता, त्या मूळ हेतूस अनुसरण करून, पुण्यातील एक ५० वर्ष जुने अनोखे गणपती मंडळ म्हणून पेरुगेट चौक मित्र मंडळ ओळखले जाते. गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट कल्पनांमुळे गेल्या १२-१३ वर्षांपासून मंडळ प्रसिद्धीझोतात आले आहे. यावर्षी पेरुगेट चौक मित्र मंडळ १० दिवसांच्या उत्सवादरम्यान स्लाइड शोद्वारे अनोखे सामाजिक प्रबोधन कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यामध्ये यंदा गणेशोत्सवात प्रथमच २डी अॅनिमेशन जंगल सफारी सादर करणार आहेत.

 स्लाईड शोचा वापर करून सर्वसामान्य जनते पर्यंत संदेश पोहचवण्यात येईल. स्लाइड शोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्लाईड शोला लागणाऱ्या सर्व गोष्टी सदस्यांनी स्वतःच्या घरातच केल्या आहेत. मंडळाचे बहुतेक सदस्य हे आयटी प्रोफेशनल्स, इतर व्यावसायिक, व्यापारी आहेत. परंतु, सर्वजण आजूबाजूला काय घडत आहे याची सर्वसामान्यांना जाणीव करून देण्याची सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी वेळ काढतात. १२  ते १५  मिनिटांच्या कमी वेळात हा संदेश प्रभावीपणे मांडणे हे खरोखरच एक अवघड आहे , परंतु पेरुगेट चौक मित्र मंडळ यामध्ये यशस्वी झाले.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना, योगेश पाटील म्हणाले की, “या वर्षी आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत. डिजिटायझेशन आणि तांत्रिक सुधारणांच्या या युगात आम्ही असे प्रयत्न करत आहोत जे यापूर्वी कोणीही केले नव्हते. गणेशोत्सवात प्रथमच आम्ही २डी अॅनिमेशन जंगल सफारी सादर करत आहोत. मनोरंजनाच्या नव्या जगाचा शोध घेताना पुण्याच्या गणेशोत्सवात हा एक मैलाचा दगड ठरेल याची आम्हाला खात्री आहे”. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, श्री अनिकेत वैद्य, श्री शैलेश गोडबोले आणि श्री  विशाल कोगजे उपस्थित होते.

 आतापर्यंत पेरुगेट चौक मित्र मंडळाने खालील स्लाइड शो केले आहेत.

•      भारतातील दहशतवाद

•      शेजारी देशातील सामाजिक-राजकिय संबंध

•      जागतिक व्यापार केंद्रावर दहशतवादी हल्ले

 *    कारगिल युद्ध

•      २६.०७.२००५  चा पूर

•      अमरनाथ यात्रा

•      वाहतूक समस्या, प्रदूषण आणि त्याचे प्रतिबंध

•      स्त्री-भ्रूण हत्या

 पेरुगेट चौक मित्र मंडळला त्यांच्या कार्यासाठी पुणे महानगरपालिका, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, विघ्नहर्ता न्यास (पुणे पोलिसांच्या नेतृत्वाखालील ट्रस्ट) तसेच विविध नामांकित संस्थाकडून पुरस्कार मिळाले आहेत.लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा उत्सव सुरू करण्याचा हेतू लोक विसरले आहेत. गणपती उत्सव साजरा करण्याचा उदेश म्हणजे, विविध समस्यांबद्दल लोकांना जागरुक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे. सामाजिक प्रबोधन करून जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने उत्सव साजरे करतात. आपण सर्वजण समाजाचे ऋणी आहोत आणि समाजासाठी काही चांगले काम करण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे.

पेरुगेट चौक मित्र मंडळाने आतापर्यंत अनेक समाजपयोगी कार्यक्रम  केले आहेत. यामध्ये रक्तदान,  चित्रकला स्पर्धा, क्वीन मेरी टेक्नीकल इन्स्टिट्यूटला भेट देणे, पॅराप्लेजिक सैन्य अधिकारी आणि जवानांच्या पुनर्वसनासाठी चालवलेले अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. किल्लारी आणि इतर जवळच्या प्रदेशांना बसलेल्या भूकंपाच्या वेळी बाधितांना वैद्यकीय आणि इतर मदत पुरवण्यात मंडळाने ठळकपणे सहभाग घेतला होता.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *