स्क्रिपबॉक्सची थेट म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आधारित सल्ला सेवा सुरू

स्क्रिपबॉक्सची थेट म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आधारित सल्ला सेवा सुरू
स्क्रिपबॉक्सची थेट म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी आधारित सल्ला सेवा सुरू

पुणे- भारतातील अग्रगण्य म्युच्युअल फंड ॲप असलेल्या स्क्रिपबॉक्सने आज थेट म्युच्युअल  फंडांसाठी गुंतवणूक सल्ला सेवा सुरू करण्याची घोषणा केली. आतापर्यंत ही सेवा हाय नेट वर्थ (एचएनआय) असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध होती, मात्र आता ती स्क्रिपबॉक्स ॲपच्या माध्यमातून मासिक शुल्क देणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

“थेट म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांना तज्ञांचा सल्ला सहज मिळत नाही. बाजारपेठेत ही एक मोठी उणीव आहे आणि ती आम्ही ॲपच्या माध्यमातून दूर करत आहोत. आमचे डिजिटल ॲप थेट म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांना एंड टू एंड उच्च दर्जाच्या सल्ला सेवा उपलब्ध करून देते. यात वैयक्तिक आर्थिक नियोजन, जोखमीची माहिती, संपत्तीचे वितरण, निधीची निवड आणि पोर्टफोलिओचा आढावा यांचा समावेश आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी मदत करणे हे आम्ही उत्कृष्टरीत्या करतो,” असे स्क्रिपबॉक्स चे संस्थापक संजीव सिंगल म्हणाले.

अधिक वाचा  सोने-चांदीच्या दरात वाढ: डॉलरच्या तुलनेत रुपया ७३ पैशांनी वधारला

थेट म्युच्युअल फंडांच्या गुंतवणूकदारांसाठी उच्च दर्जाची सल्ला सेवा उपलब्ध करून देणारे स्क्रिपबॉक्स हे पहिलेच ॲप आहे. ही सुरुवात म्हणजे लक्षावधी कुटुंबांना त्यांचे आर्थिक लक्ष्य गाठून देण्यासाठी मदत करण्याच्या स्क्रिपबॉक्सच्या मिशनचा एक भाग आहे. ही गुंतवणूक सल्ला सेवा स्क्रिपबॉक्स समूहातील कंपनी असलेल्या मित्राझ फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (सेबी नोंदणी क्रमांक INA200001041) कंपनीमार्फत पुरविण्यात येते.

स्क्रिपबॉक्सच्या मागील कामगिरीवरून उच्च दर्जाच्या आर्थिक सल्लामसलतीचे महत्त्व अधोरेखित होते. कंपनी शिफारसींनी १३ पैकी ९ कालावधीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ग्राहकांची सुरुवातीची संपत्ती स्थापनेपासून ३५ पट वाढली आहे. ज्या ग्राहकांनी २०१३ मध्ये तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुरुवात केली होती त्यांचे संपत्तीचे मूल्यांकन सध्या १०६ कोटी रुपये आहे.

अधिक वाचा  इलॉन मस्क बनले ट्विटरचे नवे बॉस, 44 अब्ज डॉलरचा झाला करार

दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या दृष्टीने तज्ज्ञांचा परिणाम मिळण्यासाठी आणि आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी सल्ला आणि आर्थिक नियोजन हे अत्यावश्यक असतात. जे ग्राहक आर्थिक सल्लागार सोबत काम करतात ते जे ग्राहक तसे करत नाहीत त्यांच्या तुलनेत अधिक चांगले परिणाम मिळवतात, असे संशोधनातून दिसून आले आहे. मात्र उच्च दर्जाचा सल्ला हा केवळ तो परवडत असलेल्या हाय नेट वर्थ असलेल्या गुंतवणूकदारांना मिळतो. स्क्रिपबॉक्स ॲप आधारित सल्ला हा किफायतशीर आहे आणि म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून आपल्या कुटुंबाचे आर्थिक ध्येय गाठण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींसाठी ते आहे. प्रमाणशीर उच्च दर्जाचा आणि वैयक्तिक सल्ला देण्यासाठी स्क्रिपबॉक्स प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते. अत्याधुनिक अल्गोरिदम आणि डाटा अॅनालिटिक्स यांचा वापर करून स्क्रिपबॉक्स प्रत्येक व्यक्तीनुसार शिफारसी पुरवू शकते. प्रत्येक गुंतवणूकदाराच्या विशिष्ट आर्थिक ध्येयाशी त्या सुसंगत असतात.

अधिक वाचा  सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल

योग्य सल्ला न मिळाल्यामुळे गुंतवणूकदारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यामुळे वेळेपूर्वी ते बाहेर पडतात आणि कमी परतावा मिळतो. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) यांच्या ३० जून पर्यंतच्या माहितीतून हा मुद्दा अधोरेखित झाला आहे : १५.६ टक्के इक्विटी अॅसेट सहा महिन्यापेक्षा अधिक गुंतवणुकीत राहत नाहीत; १०.९ टक्के इक्विटी या ६ ते १२ महिन्यांपर्यंत गुंतवणुकीत राहतात आणि २२.२ टक्के इक्विटी १२-२४ महिन्यापर्यंत गुंतवणुकीत राहतात.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love