भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक; जामिनावर सुटका


पुणे-कुख्यात गुंड गजा मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत काढलेल्या मिरवणुकीसाठी मदत करणे भाजपचे माजी खासदार आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अंजाय काकडे यांना चांगलेच महागात पडले आहे. संजय काकडे यांना आज याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची 25 हाजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली.

कुख्यात गुंड गजा मारणे यांची एका खुनाच्या खटल्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याची त्याच्या समर्थकांनी तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक काढली.या मिरवणुकीत तीनशेहून अधिक चार चाकी वाहने या मिरवणुकीत सहभागी झाली होती. सोशल मीडियावर या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर तळोजा ते पुण्यापर्यंत येणाऱ्या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गजा मारणे आणि सहभागी झालेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही आलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आल्या. त्याच दरम्यान गजा मारणेला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

अधिक वाचा  केंद्राने मराठा आरक्षणाचा कलम 370 प्रमाणे निर्णय घ्यावा: गरज पडल्यास खास एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार - अजित पवार

मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांवर मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकेची झोड उठली. त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. त्याला पोलिसांनी मेढा येथे अटक करण्यात आली होती.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love