डायमंड ज्वेलरी ब्रँड ऑराचा पुण्यातील ६ व्या नव्या दालनासह विस्तार


पुणे -देशातील आघाडीचा डायमंड ज्वेलरी ब्रँड ऑराच्या पुण्यातील सहाव्या दालनाचे उद्घाटन झाले आहे. ऑराच्या या नव्या स्टोरच्या माध्यमातून हिऱ्यांच्या दागिन्यांच्या  खरेदीसाठी  पुण्यात आता आणखी एक विश्वासाहार्य पर्याय उपलब्ध झाला आहे.

शोरूम सर्व्हे नंबर १४५, बी२/२, मगरपट्टा सिटी, हडपसर येथे मगर कुटुंबातील सदस्य यमुना मगर,रमेश मगर, शंकर मगर, सिंधू मगर यांच्या उपस्थितीत या दालनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ऑराचे इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. ऑराचे नवे कलेक्शन दाखवण्यासाठी फॅशन शोचे आयोजन  करण्यात आले होते.

ऑराचे हे नवीन दालन २१०० स्क्वेअर फूटमध्ये विस्तारले आहे. यात ब्राइडल झोनसह नाविन्यपूर्ण डायमंड ज्वेलरी कलेक्शन असणार आहे. एवढेच नाही तर देशातील सर्वात तेजस्वी हिरा व ऑराचे  पेटंट असलेले ७३ फेसेड ओरा ग्राउन स्टार देखील नवीन शॉपमध्ये उपलब्ध असेल. तसेच खास डिझायर्ड आणि प्लॅटिनम कलेक्शनचाही  यात समावेश आहे. खास लॉंचच्या निम्मिताने ग्राहकांना हिऱ्याच्या दागिने खरेदीवर २५ टक्के  सूट मिळणार आहे तसेच इएमआय सुविधांवर शून्य टक्के व्याज मिळणार आहे .

अधिक वाचा  रोटरी क्लब स्कॉन प्रो आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील पहिल्या कॉर्पोरट रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न

खरेदीचा अनुभव सुखद व आरामदायी करण्यासाठी  शोरूमची विशेष रचना करण्यात आली आहे. आरामदायी आसनव्यवस्था आणि मॉडर्न इंटिरिअर शोरूममध्ये करण्यात आले आहे. उत्पादनात नावीन्य आणून आणि दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देत ओराने त्यांच्या हिऱ्याच्या दागिन्यांचा  वारसा जपला आहेत.  टोकियो, हाँगकाँग, अँटवर्प, मुंबई आणि न्यूयॉर्क येथे ५ जागतिक डिझाइन केंद्रांसह ओराने ७०० वर्षांच्या बेल्जियन कारागिरीचा वारसा बाळगला आहे. त्यासह १०० टक्के प्रमाणित दागिन्यांसह विक्री करीत प्रख्यात ब्रँड कंपनीने जपला आहे.  ऑराने आपल्या ब्रँडच्या हिऱ्यांवर सात दिवसांच्या रिटर्न पॉलिसी व्यतिरिक्त बायबॅकची सेवा उपलब्ध केली आहे. या शोरूममध्ये ब्रँडचा खास वधूचा झोन सुद्धा असेल. ज्यात नववधू-वधूंना त्यांच्या लग्नाची खरेदी अधिक आठवणीतील करण्यासाठी खास सेवा  असेल. 

अधिक वाचा  सोनालिका पब्लिकेशन्सचे टेल्स ऑफ डिफरंट टेल्स पुस्तक लॉन्च

नवीन शोरूमच्या उद्घाटनानिमित्त,  ऑराच्या  व्यवस्थापकीय संचालक दिपू मेहता म्हणाल्या की, आम्ही मगरपट्टामध्ये आमचे सर्वात नवीन दालन सुरू करत आहोत. या दालनाच्या उद्घाटनाची घोषणा करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या नवीन डालनासह महाराष्ट्रात आमच्या स्टोअरची संख्या २० झाली आहे. तर देशात एकून ६२ स्टोअर्स झाली आहेत. पुणे ही ओरासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. या दालनाच्या माध्यमातून आमच्या ब्रँडची सेवा विस्तारणार असुन आमच्या ग्राहकांसाठी शाश्वत खरेदीचा अनुभव निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. डायमंड वेडिंग ज्वेलरीची एकूण मागणी आणि आमच्या ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन स्टोअरमधील कलेक्शन तयार केले गेले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love