सणसवाडी: मस्करीच्या नावाखाली ‘हवेचा दाब’ देऊन कामगाराचा बळी; कंपनीत खळबळ

सणसवाडी औद्योगिक वसाहत घटना
सणसवाडी औद्योगिक वसाहत घटना

पुणे(प्रतिनिधी)–पुणे जिल्ह्यातील सणसवाडी औद्योगिक वसाहतीत मस्करीच्या नावाखाली केलेल्या एका अघोरी आणि अमानुष कृत्यामुळे एका कष्टकरी कामगाराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कंपनीत काम करत असताना एका सहकाऱ्याने दुसऱ्या कामगाराच्या गुदद्वारात उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर पाईप घुसवल्याने पोटातील अंतर्गत अवयव निकामी होऊन या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३० जून २०२६ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास सणसवाडी येथील ‘वेस्टर्न इंडिया फोर्ज प्रा. लि.’ या कंपनीत घडली. नरेश सुलेंद्र यादव (वय ४२, मूळ रा. गया, बिहार) असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी बिकीकुमार भाईलाल सरोज या आरोपी सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मृत नरेश यादव यांचे मेहुणे संतोषकुमार किशोर यादव यांनी यासंदर्भात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा  सावधान ; चॅट जीपीटीला अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यास आपण गंभीर संकटात सापडू शकता..

३० जून रोजी रात्रीची शिफ्ट संपत आलेली असताना आरोपी बिकीकुमार याने अचानक नरेश यादव यांच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाईप लावला. या पाईपमधून अत्यंत उच्च दाबाची हवा बाहेर पडत होती, जी थेट नरेश यांच्या शरीरात शिरली. हवेच्या या प्रचंड दाबामुळे त्यांच्या पोटातील अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाली आणि ते वेदनेने विव्हळत जागीच कोसळले. त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

एका नामांकित कंपनीच्या आवारात आणि ड्युटीवर असताना असा जीवघेणा प्रकार घडल्याने कामगारांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्कशॉपमध्ये काम सुरू असताना सुपरवायझर्सचे नियंत्रण नव्हते का? आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन तिथे होत होते का? असे अनेक गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

अधिक वाचा  एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे १४वी ‘भारतीय छात्र संसद’ एमआयटी डब्ल्यूपीयूत

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कारंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीने हे कृत्य निव्वळ मस्करीतून केले होते की त्यामागे काही जुने भांडण किंवा पूर्ववैमनस्य होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, या घटनेत कंपनी व्यवस्थापनाचा काही निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love