Muralidhar Mohol's mother is in tears

मुरलीधर मोहोळ यांच्या आईला अश्रु अनावर : मुरली नक्कीच दिल्लीला जाईल

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)— “मी फक्त मुरली मोहोळची आई नाही तर मी पुणेकरांची आई म्हणून सगळ्या पुणेकरांना मतदानाचं आवाहन करते, असे आवाहन करतानाच महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या आईला अश्रु अनावर झाले. मुदरम्यान, मुरली नक्कीच दिल्लीला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली.

पुणे लोकसभा महायूतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचे मंतदानाला जाण्यापूर्वी त्यांच्या आई आणि पत्नीने औक्षण केले, घरातील ज्येष्ठांचा आशिर्वाद घेतला आणि त्यानंतर ते कुटुंबियांसोबत मतदानासाठी रवाना झाले.  मोहोळ यांनी ग्रामदेवता कसबा गणपतीची आरती आणि तांबडी जोगेश्वरी देवीचेही दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

मोहोळ यांचे औक्षण केल्यानंतर त्यांच्या आईने, “मी फक्त मुरली मोहोळची आई नाही तर मी पुणेकरांची आई म्हणून सगळ्या पुणेकरांना मतदानाचं आवाहन करते, अशी प्रतिक्रिया दिली. मागील 20 वर्ष मुरलीधर मोहोळांनी खूप काम केलं. लोकसभेची उमेदवारी त्याचीच पावती आहे, असं मुरलीधर मोहोळांच्या पत्नी म्हणाल्या. मुरलीधर मोहोळ शंभर टक्के जिंकणार असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. त्यांच्या आईलादेखील अश्रु अनावर झाले.

पुणेकरांनी एकत्र येत मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी

दरम्यान, आपली लोकशाही ही देशातली सुदृढ लोकशाही आहे आणि आपण या लोकशाहीचा भाग आहोत. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आपल्याला बजावलं पाहिजे. त्यामुळे मोठ्या संख्येने पुणेकरांनी एकत्र येत मतदान करावं आणि लोकशाही बळकट करावी, असं आवाहन मुरलीधर मोहोळ  यांनी मतदानापूर्वी केलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *