Supriya Sule vs Sunetra Pawar fight?

रोहित पवारांचं भाकीत खरंं ठरलं : ट्वीट होतंय सोशल मिडीयावर व्हायरल

राजकारण
Spread the love

पुणे – मंगळवारी पेट्रोलच्या दरात  15 पैसे तर डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ झाली.  तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निमिताने कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं ट्वीट सोशल मिडीयावर चांगलचं व्हायरल होत आहे.

“चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय!”, असं ट्वीट पवार यांनी 2 मे रोजी केलं होतं. त्यांनी व्यक्त केलेली ही भीती खरी ठरल्याने नेटकर्यांनी त्यांचे हे ट्वीट व्हायरल केलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 27 फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात उलट इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. मात्र, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरु असल्याने केंद्र सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नव्हते. त्यामुळे किमान मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलचे दर कृत्रिमरित्या कमी ठेवले जातील, असा जाणकारांचा अंदाज होता. त्यानुसार मंगळवारी पेट्रोल 15 पैसे तर डिझेल 18 पैशांनी महागले. तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

 आज केंद्राने इंधन दरवाढ केल्यानंतर रोहित यांनी पुन्हा ट्विट केलं आहे. जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, असं सूचक विधान रोहित यांनी केलं आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *