अजित पवार यांचा राजीनामा घेणार का?- आशिष शेलार


मुंबई- पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसने २०० पेक्षा जास्त जागांवर विजय संपादित केला आहे. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते या रणांगणात उतरले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅट्रिक साधली. यावरून  राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पश्चिम बंगालच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी समाचार घेत,” पश्चिम बंगालच्या पराभवाची जबाबदारी घेऊन, अमित शहा यांचा राजीनामा मागणारे मलिक, पंढरपूरच्या पराभवाची जबाबदारी म्हणून अजित पवार यांचा राजीनामा घेणार का?”, असा सवाल त्यांनी केला आहे.

अधिक वाचा  मराठा आरक्षण: उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील- उदयनराजे

आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यासह सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेणे म्हणजे नवाब मलिक. मोफत लसीच्या मुद्द्यावर ते तोंडावर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये, असं सांगतानाच तेच नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजिनामा मागणार का? या पराभवाची जबाबदारी स्विकारून स्वत: मलिक राजीनामा देणार का? असा सवाल शेलार यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love