पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणुक लढवण्यासही तयार- नाना पटोले

निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार
निवडणुकीनंतरच मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेण्यात येणार

Nana Patole : मी पक्षाचा शिपाई आहे, पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभा निवडणुक Loksabha Election) लढवण्यासही तयार असल्याचे पटोले यांनी सांगितले. भाजपेच (bjp) नेते सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा ( अपमान करत असून भगतसिंह कोशारी (Bhagatsingh Koshari ) यांनी केलेला अपमान राज्यातील जनता अजून विसरलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले.(Ready to contest the Lok Sabha elections if the party gives the order)

त्या गोष्टी जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भारत न्याय यात्रा

देशात अराजकतेची राजवट सुरू आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना हुकूमशाही पद्धतीने निलंबीत करण्यात आले आहे. सत्ताधार्‍यांकडून अनेक गोष्टी जनतेपर्यंत योग्य पद्धतीने पोहचू दिल्या जात नाहीत. या गोष्टी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राहुल गांधी यांची मणीपूर ते मुंबई अशी भारत न्याय यात्रा काढण्यात येणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुणे जिल्ह्यात ‘महाविजय’ साकारण्याचा महायुतीचा निर्धार

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत

जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही एकसंघ असून लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी ४० ते ४१ जागा जिंकेल असा दावा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला .

पटोले म्हणाले, शरद पवार, मी किंवा उद्धव ठाकरे यापैकी कोणीही अद्याप जागावाटपासंदर्भात काहीही बोललेलो नाही. जागावाटपावरून मतभेद असल्याच्या बातम्या निराधार असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. जागावाटपाचा प्रश्न दिल्लीमध्ये होणार्‍या बैठकीत मार्गी लावला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. जे कोणी भाजपच्या विरोधात लढण्यास तयार आहेत, त्यांना सोबत घेण्याची आमची भूमीका असल्याचे पटोले यांनी अ‍ॅड. प्रकार आंबेडकर व राजू शेट्टी यांच्या आघाडीतील समावेशाच्या प्रश्नावर स्पष्ट केले.  दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाचे उद्या बैठक होणार आहे, या बैठकीत राज्यातील परिस्थितीची माहिती वरीष्ठांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love