Do a caste wise census in the state

तर…राज्यात जातीनिहाय जनगणना करून टाका- छगन भुजबळ

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Chhagan Bhujbal-मराठा समाजाला (Maratha Society) आरक्षण (Reservation) देण्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात येत आहे ते १५ दिवसांत पूर्ण करणार असल्याचे बोलले जात आहे. इतक्या कमी वेळेत जर सर्वेक्षण (Survey) होणार असेल तर राज्यात जातीनिहाय जनगणना(Caste wise census)करून टाका अशी मागणी राज्याचे ओबीसी (obc) नेते अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी केली आहे.(Do a caste wise census in the state)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांच्या जन्मदिनानिमित्त भुजबळ यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन केले. छगन भुजबळ पुण्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात येत आहे ते १५ दिवसांत पूर्ण करणार, असं सांगण्यात येत आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये सर्वेक्षण होणार असेल, तर बिहार प्रमाणे महाराष्ट्रात जाती गणनाच करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) भुजबळांना वेड लागले आहे, अशी टीका केली होती. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, ‘हो मला वेड लागले आहे. गेले ३५ वर्ष मला ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी काम करण्याचं वेड लागलं आहे. फुले(Phule) -शाहू(Shahu)- आंबेडकर(Ambedkar) यांच्या मार्गाने जाण्यासाठी मला वेड लागलं आहे. हे वेड शेवटच्या श्वासापर्यंत जाणार नाही.

मागासवर्गीयांसाठी काम करा. हेच महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी कुठेही असलो तरी ३  जानेवारीला नायगाव येथे जातोच हा माझा नित्यनियम आहे. राज्यात जे ओबीसी एल्गार मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये जो मोर्चा ⁠१३  तारखेला बीडला होणार आहे तिथे मी जाणार आहे. बीडला जे घडले त्यामुळे तिथे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे तिथे सभा घेणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पंढरपूर येथील ओबीसी एल्गार सभेला जाणार मात्र नांदेड येथील सात तारखेच्या ओबीसी एल्गार सभेला मी जाणार नाही. कारण त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत महत्त्वाचा कार्यक्रम आहे, असे भुजबळ यांनी सांगितले

‘देशात सगळीकडे मोदी लाट आहे. पुन्हा तेच पंतप्रधान होतील. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत, म्हणजे शिंदे आमचेच आहेत,’ असे भुजबळ म्हणाले.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे यांची मागणी आहे आणि अंतरवाली सराटी मध्ये कुणबी नोंदी सापडल्या नाहीत यावर छगन भुजबळ म्हणाले, जरांगे हे आता कुणबी नोंदी मागण्याच्या पुढे गेले आहेत. ते आता सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या असं म्हणत आहेत. जरांगे “⁠एका बाजुने ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे यासाठी ताकत लावत आहेत. तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे यांनी माळी, कोळी, साळी यांना ओबीसीमधून काढावे यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.. त्याबाबत आज सुनावणी आहे.

महानंदाकडून त्रुटी…

महानंद डेअरीच्या बाबतीत छगन भुजबळ यांचे मोठं विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, ज्याच्या नावात महा आहे. अशी संस्था बाहेर जाणं हे मला तरी वैयक्तिक पटलेलं नाही. महानंदाच्या कामात सरकारकडून आणि महानंदाकडून त्रुटी राहिल्याचं दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात माझ्या शुभेच्छा असे भुजबळ म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *