‘राम तेरी गंगा मैली’ फेम राजीव कपूर यांचे निधन:वर्षभरात कपूर कुटुंबियांना दूसरा धक्का

पुणे-मुंबई
Spread the love

मुंबई – ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेलेल आणि तत्कालीन तरुणाईच्या गळ्यातील ताईत झालेले कपूर घराण्यातील जेष्ठ अभिनेते राजीव कपूर (rajiv kapoor) (वय-58) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने(Heart Attack) निधन झाले. राजकपूर यांचे पुत्र आणि रणधीर कपूर (randhir Kapoor)आणि ऋषि कपूर यांचे राजीव कपूर हे लहान भाऊ आहेत. गेल्या वर्षी वर्षीच ऋषि कपूर यांचे कर्करोगाने निधन झाले होते. त्या दुखा:तून कपूर कुटुंबीय सावरलेले नसताना हा दूसरा धक्का बसल्याने कपूर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

राजीव कपूर यांना आज त्रास होऊ लागल्याने त्यांना त्यांचे बंधु रणधीर कपूर यांनी तात्काळ चेंबूर मधील ईनलॅक्स रुग्णालयात दाखल केले. परंतु, हृदयविकाराचा झटका तीव्र असल्याने डॉक्टरांनाही त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

‘मी माझ्या छोटा भाऊ गमावला आहे, डॉक्टरांनी शरथीचे प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही, रंजीव आता या जगात नाही’’, असे रणधीर कपूर यांनी म्हटले आहे. तर राजीव कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू कपूर यांनी रंजीव कपूर यांचा फोटो पोस्ट करत ‘रेस्ट ईन पीस’ असे म्हटले आहे.

राजीव कपूर यांच्या कारकिर्दीला ‘जिम्मेदार’ चित्रपटाने सुरुवात झाली खरी परंतु त्यांना खरी ओळख ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाने मिळाली. 1985 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. त्यांनी नंतर चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही काम केले. ऋषि कपूर यांची भूमिका असलेल्या “प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले तर ‘हीना’ आणि ‘आ अब लौट चले’या चित्रपटांची निर्मितीही केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *