सांगली येथे शासन सहभागाने ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार- चंद्रकांतदादा पाटील

सांगली येथे शासन सहभागाने ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार
सांगली येथे शासन सहभागाने ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार

पुणे(प्रतिनिधि)–पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे अभिवचन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिले.

पाटील पुढे म्हणाले की देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खेळ आणि खेळाडूंचा उत्कर्ष व्हावा यासाठी मोदी सरकार प्रयत्नशिल आहे. यासाठी खेळाडू आणि खेळांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने देखील ऑलिम्पिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या यादीतील खेळाडूंना नोकरीमधील पाच टक्के आरक्षण आणि दहावी तसेच बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 25 मार्कांची उपलब्धता करून दिलेली आहे तसेच रोख रकमांचीही तरतूद केली आहे.

अधिक वाचा  Kharadi Rave Party case : एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ जणांना पोलीस कोठडी, राजकीय षडयंत्राचा आरोप

शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स आणि पुनीत बालन गृप यांचा सहकार्याने आयोजित 15 ते 18 वयोगटातील कॅडेट श्रेणीच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धांचे आयोजन दिनांक 23 ते 25 जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी 29 राज्यातील जवळपास 600 खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि पदाधिकारी यांनी पुणे शहरात आगमन केले आहे.

प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन यांनी या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेतील कॅडेट गटाच्या विजेत्या खेळाडूंसाठी भरघोस बक्षिसांची घोषणा केली. यामध्ये त्यांनी मुलामुलींच्या एकूण 16 वजन गटातील प्रत्येक सुवर्णपदक प्राप्त खेळाडूसाठी 11000, रौप्यपदक प्राप्त खेळाडूसाठी 7000 तर दोन कांस्यपदक विजेत्यांसाठी 5000 प्रत्येकी अशी जवळपास पांच लाख रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली.

अधिक वाचा  युपीआय व्यवहारांवर खरोखरच कर लागणार? जाणून घ्या एनपीसीआय आणि एमडीआर शुल्काचे खरे वास्तव

स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि चषक अनावरण कार्यक्रमाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या अध्यक्षा मनीषा मल्होत्रा आणि तथागत मुखर्जी, ॲक्सिस बँकेचे सईद हैदर तसेच आदित्य गोल्हटकर, भारतीय ज्यूदो महासंघाचे निरीक्षक वीरेंद्र वशिष्ठ आणि सहायक सचिव सी एस राजन उपस्थित होते. कार्यक्रमास द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक जीवन शर्मा आणि अर्जुन पुरस्कार विजेते यशपाल सोलंकी, स्पर्धा प्रमुख जे आर राजेश यांसह राज्य ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोसले यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे महासचिव शैलेश टिळक यांनी तर आभार तांत्रिक सचिव दत्ता आफळे यांनी केले.

कार्यक्रमात छत्तीसगड राज्यातील अत्यंत दुर्गम परिसरात राहणाऱ्या कुमारी हेमावती नाग या आदिवासी बालिकेने कोणतीही विशेष साधन सुविधा उपलब्ध नसतानाही राष्ट्रीय शालेय आणि राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये अनेक पदके पटकावली आणि म्हणून तिला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला, याबद्दल तिचा या कार्यक्रमात विशेष सत्कार मंत्री चंद्रकांत दादा यांच्या हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा  पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग रचनेवरुन राजकीय वातावरण तापले : चार सदस्यीय प्रभाग रचनेला शिवसेना (ऊबाठा) आणि कॉँग्रेसचा विरोध

आज होणाऱ्या स्पर्धेमध्ये मुलींच्या 40, 48, 52, आणि 57 किलोखालील गटांच्या तर मुलांच्या 50, 55, 60, आणि 66 किलोखालील गटांच्या स्पर्धांना प्रारंभ झाला. दुपारी चार नंतर या गटातील अंतिम सामान्यांना प्रारंभ होईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love