अमेरिकन भारतीयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही सर्वाधिक लोकप्रिय


ऑनलाइन टीम (वॉशिंग्टन)–पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही अमेरिकास्थित भारतीयांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे एका सर्वेक्षणात सिद्ध झाले आहे. कार्नेगी सेंटर फॉर एंडोमेंट ऑफ पीसने Carnegie Center for Endowment of Peace अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदींप्रती अर्ध्याहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे भारतातील लोकशाहीच्या सद्यस्थितीबद्दल त्यांचे मत विभागले गेले असले तरी, मोदी आणि भाजपावरील भारतीयांचा विश्वास अजूनही अबाधित असल्याचे या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

गेल्या वर्षी 1 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात 1,200 लोकांनी भाग घेतला. सर्वेक्षणात असलेल्या लोकांना भारत योग्य मार्गावर आहे का असे विचारले असता 36 टक्के लोकांनी त्याला सहमती दर्शविली होती तर 39 टक्के लोकांनी नाही असे म्हटले होते.25 टक्के लोकांनी यावर कोणतेही मत दिले नाही.

अधिक वाचा  कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते?

 या सर्वेक्षणात भारतीय अमेरिकन लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची लोकप्रियता स्पष्टपणे दिसून आली आहे. सर्वेक्षण झालेल्या 35 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कार्याचे खूप छान काम म्हणून कौतुक केले आहे.  13 टक्के लोकांनी ते चांगले असल्याचे म्हटले आहे तर 22 टक्के लोकांनी अत्यंत खराब कामगिरी  असल्याचे मत व्यक्त केले आहे.

सर्वेक्षण झालेल्या 32 टक्के लोकांनी भाजपाला पाठिंबा दर्शविला तर केवळ 12 टक्के लोकांनी कॉंग्रेसला पाठिंबा दर्शविला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 40 टक्के लोकांनी असे सांगितले की त्यांना भारतातील कोणत्याही राजकीय पक्षाची माहिती नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love