फूड डिलिव्हरी बॉयचा अश्लिल शेरेबाजी करत तरुणीला बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न

Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up
Union Minister Muralidhar Mohol's office employee brutally beaten up

पुणे—एक 30 वर्षीय तरुणी तिच्या भावासह घरी जात असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने अश्लिल शेरेबाजी करत बळजबरीने मिठी मारुन चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुण्यातील वाकड परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलिसात धाव घेऊन अज्ञात डिलिव्हरी बॉयच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीस या विकृत आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नेपाळ येथील असून ती आणि तिचा भाऊ यांचा चायनीज फूड विकण्याचा व्यवसाय आहे.  रात्री उशिरा त्यांची गाडी बंद होते. सोमवारी मध्यरात्री पाऊने बाराच्या सुमारास भाऊ आणि बहीण दोघे ही घराच्या दिशेने चालत जात होते. रात्री उशीर झाल्याने कुत्रे भुंकत होते म्हणून भाऊ कुत्र्यांना हकलवत पुढे चालत होता. तेवढ्यात, अचानक दुचाकीवरून आलेल्या फूड डिलिव्हरी बॉयने तरुणी एकटी असल्याच पाहून बेसावध तरुणीच्या जवळ येत अश्लील शेरेबाजी केली. दुचाकीवरूनच एका हाताने मिठी मारून गालाचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. तसेच अश्लीश चाळे करण्याचा देखील प्रयत्न केला. 

अधिक वाचा  सामाजिक समरसतेसाठी वरदान : सवर्ण आरक्षण

दरम्यान तिच्या भावाला पाहताच फूड डिलिव्हरी बॉय तिथून फरार झाला आहे. या घटनेमुळे तरुणीच्या मनात भीती निर्माण झाली असून शहरात महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. अद्याप आरोपीला अटक नसून त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love