आंतरराष्ट्रीय नेमबाज पूजा घाटकर यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी निवड

पूजा घाटकर आशियाई क्रीडा स्पर्धा प्रशिक्षक
पूजा घाटकर आशियाई क्रीडा स्पर्धा प्रशिक्षक

पुणे(प्रतिनिधी)– पुण्याची कन्या आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज कु. पूजा घाटकर यांची जपानमध्ये होणाऱ्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय १० मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

पर्वती येथील रहिवासी असलेल्या पूजा घाटकर यांनी ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई अजिंक्यपद, राष्ट्रकुल अजिंक्यपद आणि विश्वचषक स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.

मार्च २०२५ पासून त्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ देशातील नवोदित नेमबाजांना होत आहे. आगामी आशियाई स्पर्धेसाठी त्यांची झालेली नियुक्ती ही पुणे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

अधिक वाचा  Bharat Asmita National Award : भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर: प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, ज्योथिमणी सेन्नीमलाई, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान होणार सन्मान

त्यांचा अनुभव, नेतृत्वगुण आणि खेळाप्रती असलेली निष्ठा भारतीय संघातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यासाठी निश्चितच मोलाची ठरेल.  या प्रतिष्ठित नियुक्तीबद्दल क्रीडा क्षेत्रातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love