gtag('js', new Date());
  • Home
  • पुणे-मुंबई
  • पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! २३ एप्रिलला शहरात पाणी कपात; ‘या’ भागात नळ राहतील कोरडे
पुणे पाणी कपात २३ एप्रिल २०२६

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! २३ एप्रिलला शहरात पाणी कपात; ‘या’ भागात नळ राहतील कोरडे

Spread the love

पुणे(प्रतिनिधी)–पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलकेंद्रांमधील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव जलकेंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र आणि चांदणी चौक जलकेंद्र यांसारख्या महत्त्वाच्या केंद्रांमधील दुरुस्तीची कामे या दिवशी हाती घेतली जाणार आहेत. हा पाणीपुरवठा खंडित होण्याचा कालावधी बुधवार रात्री १२:०० वाजेपासून ते गुरुवार रात्री १२:०० वाजेपर्यंत असा पूर्ण २४ तासांचा असेल. या दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी, २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी शहराचा पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.

अधिक वाचा  पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार : नारायण राणे

या पाणी कपातीचा मोठा फटका शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांनाही बसणार आहे. पर्वती जलकेंद्र विभागांतर्गत येणाऱ्या सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, सहकारनगर, बिबवेवाडी, मुकुंदनगर, पर्वती दर्शन, महर्षीनगर, सातव टोळी आणि मुकुंदनगर या भागांत गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, लष्कर जलकेंद्र आणि खराडी पंपिंग अंतर्गत येणाऱ्या संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोडची दक्षिण बाजू, कोंढवा आणि येवलेवाडी या परिसरातील नळ गुरुवारी कोरडेच राहतील.

पश्चिम पुण्यातील वारजे जलकेंद्र आणि चांदणी चौक टाकी परिसरातील पाषाण, बावधन, भूगाव रोड परिसर, कोथरूड, कर्वेनगर गावठाण, वारजे माळवाडी आणि डावी भुसारी कॉलनी यांसारख्या भागांतही पाणी बंद राहील. वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या हिंगणे, आनंदनगर, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी आणि कात्रज या परिसरातील नागरिकांनाही पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. याव्यतिरिक्त एस.एन.डी.टी. केंद्रांतर्गत येणारे गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वेताळ टेकडी आणि सेनापती बापट रोडवरील परिसर तसेच भामा आसखेड प्रकल्पांतर्गत येणारे लोहगाव, कळस, धानोरी, विमाननगर, वाघोली आणि विश्रांतवाडी या भागांतील पाणीपुरवठाही गुरुवारी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील खडकवासला, नांदेड, सणस आणि हायवे ब्रिज नऱ्हे या बुस्टर पंपिंग अंतर्गत येणाऱ्या भागांतही ही पाणी कपात लागू असेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the loveसुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला की…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी सकाळी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

पुणे: अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून १३ ‘बोगस’ शाळांची यादी जाहीर : प्रवेश न घेण्याचे आवाहन

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)-शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, पुणे महानगरपालिकेने यावर कठोर पाऊल…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! २३ एप्रिलला शहरात पाणी कपात; ‘या’ भागात नळ राहतील कोरडे

by News24Pune time to read: <1 min
0