वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगर परिसरात 100 पिंपळाचे वृक्षारोपण

Spread the love

पिंपरी(प्रतिनिधी)–वृक्षदाई प्रतिष्ठान, भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्तपणे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे ‘सण वृक्षांचा’ या अभियानाअंतर्गत पिंपळाच्या सहा फूट उंच वृक्षांची लागवड करून बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

 वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा ही निसर्ग आणि अध्यात्म याची अनुभूती देणारा दिवस आहे. त्याच दिवशी गौतम बुद्धांना बोधी वृक्षाखाली आत्मअनुभूतीचा साक्षात्कार झाला आणि तोच बोधी वृक्ष म्हणजे पिंपळ. या वृक्षाची लागवड करण्यात आली. भंते झेन मास्टर सुद्दसन यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जोपासेठ पवार, जगन्नाथ नाटक पाटील, उपसरपंच संतोष हगवणे, जगन्नाथ जरग, सुभाष पाटील, सचिन पवार, अर्जुन शिंदे, दीपक कसाळे, सतीश चव्हाण, शेवकर सर आदी उपस्थित होते.    

अधिक वाचा  अबब! दिवसभरात कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू

 या उपक्रमाबाबत बोलताना अरुण पवार म्हणाले, की आम्ही संयुक्तपणे गेल्या पाच वर्षापासून देहू आणि परिसरात वृक्ष संवर्धनाचे काम केले जाते. गेल्या पाच वर्षात हजारो झाडांची लागवड आणि जोपासना या संस्थांमार्फत केली जात आहे. वृक्षलागवड आणि संवर्धन ही सामाजिक चळवळ व्हावी, यासाठी असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love