प्रवीण तरडे यांनी का मागितली दलित बांधवांची माफी?


पुणे–मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलेल्या गणपती सजावटीची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आणि त्यातून प्रवीण तरडे यांना ट्रोल व्हावे लागले. मात्र, त्यानंतर तरडे यांनी आपली झालेली चूक मान्य करीत माफी मागितली.

 प्रवीण तरडे यांनी गणेशमूर्तीच्या बाजूला पुस्तकांची सजावट केली होती. पण मूर्ती ज्या पाटावर ठेवली होती त्याच्या खाली संविधानाचे पुस्तक ठेवले होते. यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल व्हावे लागले.

टीका होऊ लागल्यानंतर प्रवीण तरडे यांनी तात्काळ ती पोस्ट डिलीट केली. सोबतच माफी मागणारा एक व्हिडीओ अपलोड केला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “माझ्या घरी पुस्तक गणपती अशी संकल्पना होती. बुद्धीची देवता आणि बुद्धीचं सर्वात मोठं प्रतिक अशी माझी एक भावना होती. पण मी केलेली चूक अनेकांनी माझ्या लक्षात आणून दिली. आरपीआय, भीम आर्मी तसंच लातूर आणि पुण्यातील संघटनांनी मला याची जाणीव करुन दिली. मी सर्व दलित बांधवांची, ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांची जाहीर माफी मागतो”.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  पुणे जिल्ह्यात ‘महाविजय’ साकारण्याचा महायुतीचा निर्धार