ज्ञान तीर्थक्षेत्र आळंदी-देहू ते विद्वतनगरी काशी-वाराणसी : जगाच्या नकाशावर भारत ‘विश्वगुरू’ची उद्घोषणा


पुणे-  भारताचे द्रष्टे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैश्विक संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या नॉलेज कॉरिडॉरमधून ‘भारत विश्वगुरू’ या संकल्पनेची उद्घोषणा ९ व्या विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या जागतिक परिषदेचे संकल्पक व संयोजक, थोर शिक्षणतज्ञ विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केली. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ९ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान ही परिषद नवनिर्मित श्री काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर करण्यात आली होती.

४५ वर्षे अथकपणे विश्वशांती, मानवता आणि सांप्रदायिक सद्भावनेचे कार्य करणारे, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली-जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज ते तत्त्वज्ञ शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणजेच अध्यात्म ते विज्ञान या प्रवासाला एक नवीन अर्थ देणारे  विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना या ९व्या जागतिक परिषदेमध्ये काशी विद्वत परिषदेच्या वतीने ‘विश्वशांती विद्यारत्न’, बनारस हिंदू विद्यापीठाच्या भारत अध्ययन केंद्रातर्फे ‘विश्वशांती उद्गाता’,  बनारस हिंदू विद्यापीठाच्या युनेस्को अध्यासनातर्फे ‘समर्पिंत जीवन गौरव पुरस्कार’ आणि  संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातर्फे ‘संस्कृत श्री’  असे अत्यंत प्रतिष्ठेचे सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अधिक वाचा  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण

९व्या जागतिक परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री व बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे माजी कुलपती डॉ. करणसिंग यांनी केले होते. यावेळी इंद्रेश कुमार, प्रमोद कुमार, योगी अमरनाथ, अविनाश धर्माधिकारी, भूषण पटवर्धन, डॉ. ए. एस. किरण कुमार यांची सन्माननीय उपस्थिती होती. याप्रसंगी जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा सहभागी झाले होते.

जागतिक परिषदेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, १० फेब्रुवारी रोजी पार पडलेला सर्व धर्मीय शुभाशिर्वाद सोहळा आहे. यामध्ये जगातील सर्व धर्मग्रंथ हे खर्‍या अर्थाने जीवनग्रंथ आहेत, या तत्त्वावर आधारित जगातील विविध धर्मांचे पवित्र भगवद्गीता, पवित्र, कुराण, पवित्र बायबल, पवित्र त्रिपिटक, पवित्र गुरु ग्रंथसाहेब, पवित्र तोराह यांचे त्या त्या धर्मातील मानवकल्याणाविषयीचे मुलभूत तत्त्वज्ञान थोडक्यात उपस्थितांसमोर मांडण्यात आले. प्रत्येक धर्माची उपासनापद्धती वेगळी असली, तरी सर्व धर्मांमध्ये प्रेम, करुणा, दया, त्याग, समर्पण याचीच शिकवण दिली जाते.

अधिक वाचा  जिल्हाधिका-यांच्या नावाने सोशल मीडियामध्ये फिरणारा ‘तो’ संदेश खोटा

सदरील ९ व्या जागतिक परिषदेमध्ये विविध विषयांवरील एकूण १० सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये चाणक्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश धर्माधिकारी, नॅकचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, इटलीचे माजी राजदूत डॉ. बसंत गुप्ता, बिहारचे माजी पर्यटन मंत्री प्रमोद कुमार, सुप्रसिध्द वैद्यकीय तज्ञ डॉ. दिपक रानडे, ज्येष्ठ तज्ञ हरी राम त्रिपाठी, थोर विचारवंत डॉ. रामविलास वेदांती, आचार्य लोकेश मुनी, फिरोज बख्त अहमद, फेलिक्स मच्याडो, डॉ. एडिसन सामराज, डॉ. अ‍ॅलेक्स हॅन्की, सौ. आनंदी रविनाथन् अशा अनेकांनी विद्वत्तापूर्ण विचार मांडले.

 या ऐतिहासिक परिषदेची सांगता काशी बनारस जाहीरनाम्याच्या द्वारे करण्यात आली. सदरील ऐतिहासिक जाहीरनाम्या द्वारे, सर्वसंमतीने भारत विश्वगुरू असा उद्घोष करण्यात आली. तसेच उपस्थितांनी  स्वामी विवेकानंदांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने कार्यरत राहण्याची कटिबध्दता जाहीर केली.

अधिक वाचा  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भिषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, पर्यावरण तज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि प्रा.मिलिंद पात्रे उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love