आपला नाद करायचा नाय;सरकार बदलणे येड्या गबाळ्याचे काम नाही- अजित पवार

राजकारण
Spread the love

पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत “सरकार कधी बदलायचे हे माझ्यावर सोडा” असे म्हणत राजकीय क्षेत्रात खळबळ उडून दिली होती. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “सरकार बदलणे येड्या गबाळ्याचे काम नाही”, अशा शब्दांत समाचार घेतला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथे झालेल्या सभेत, “‘अरे सरकार कधी बदलायचे ते माझ्यावर सोडा’, असे विधान करत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. हे महावसुली सरकार आहे. या सरकारचा अन्याय, दूराचार आणि भ्रष्टाचार रोखण्याची व हे सरकार चालवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची पहिली संधी मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील नागरिकांना मिळाली आहे, ती दवडू नका, असेही फडणवीस म्हणाले होते.

त्यावर अजित पवार यांनी, “आपला नाद करायचा नाय, एकतर आपण कोणाच्या नादी लागत नाही आणि आपल्या कोणी नादी लागलं तर त्याला असं तसं सोडत नाही असे म्हणत तुम्ही काय सांगता सरकार बदलेल, सरकार बदलणे येड्या गबाळ्याचे काम नाही, महाविकास आघाडीचे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय”,अशा शब्दांत खरपूस समाचार घेतला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *