दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (२३ डिसेंबर)


पुणे-  नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी (२३ डिसेंबर) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळाद्वारे निकाल पाहता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील. निकालची प्रिंटआऊट घेता येईल. उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Governor Ramesh Bais : प्राथमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील -राज्यपाल रमेश बैस