मानवी राखीतून दिला सर्वधर्मसमभावाचा संदेश : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्तर्फे गंगोत्री धाम तिबेट बॉर्डरवरील हर्षिल गावामध्ये भारतीय सैनिकांसोबत रक्षाबंधन

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्तर्फे गंगोत्री धाम तिबेट बॉर्डरवरील हर्षिल गावामध्ये भारतीय सैनिकांसोबत रक्षाबंधन
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्तर्फे गंगोत्री धाम तिबेट बॉर्डरवरील हर्षिल गावामध्ये भारतीय सैनिकांसोबत रक्षाबंधन

पुणे : मजहब नही सिखाता, आपसमें बैर रखना… या ओळींतून सर्वधर्मसमभावाचा संदेश देत न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या विद्यार्थ्यांनी मानवी राखी साकारली. तसेच इन्स्टिटयूटस्तर्फे गंगोत्री धाम तिबेट बॉर्डरवरील हर्षिल गावामधील भारतीय सैनिकांसमवेत विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या राख्या बांधून संस्थेच्या पदाधिका-यांनी रक्षाबंधन मोठया उत्साहात साजरे केले.

जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात भव्य मानवी राखी साकारण्यात आली होती. तर, तिबेट बॉर्डरवरील गावामध्ये खजिनदार सुरेखा जाधवर, ओबीसी महासंघाच्या अध्यक्ष स्वाती मोराळे, कार्याध्यक्ष रवीकर मोराळे, राष्ट्रवादी महिला धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष प्रमिला मोराळे, स्टारवन सिक्युरिटी अध्यक्ष रत्नाकर मोराळे यांच्या उपस्थितीत भारतीय सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

अधिक वाचा  सक्सेस स्टोरींचा विचार करून राज्य सरकारने शाळांबाबत निर्णय घ्यावा - सुप्रिया सुळे

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, रक्षाबंधन हा बहिण आणि भावाचा सण. आपल्या कुटुंबापासून शेकडो मैल दूर असलेल्या सिमेवरील सैनिकांसोबत यंदा राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच सध्या सुरु असलेल्या जाती-पातीच्या वातावरणात एकतेचा संदेश देण्याकरिता विद्यार्थ्यांनी पुण्यात मानवी राखी देखील साकारली. लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्मसमभावाचा संदेश जावा, याकरिता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love