सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा १५ फेब्रुवारी पासून

महाराष्ट्र शिक्षण
Spread the love

पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ च्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या १५ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली.

परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. ज्या पात्र विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रे सादर केली आहेत त्या विद्यार्थ्यांना युजर आयडी व पासवर्ड हे एसएमएस आणि ई मेल तसेच एसपीएस प्रणालीमार्फत वितरित करण्यात आलेले आहेत. दिनांक १०, ११ व १२ फेब्रुवारी रोजी बहुतांशी परीक्षांची सराव चाचणी घेण्यात येणार आहे. प्रथम वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच इतर समकक्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षा उशिरा असल्याने त्यांच्या सराव परीक्षा १९ व २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येतील. सर्व सराव परीक्षांचे वेळापत्रक व विषय समकक्षता विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही काकडे यांनी सांगितले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *