समस्त देशाने पं. नेहरुंना १७ वर्षे पंतप्रधानपदी बसवले, ही बाब अमित शहा सोईस्कर विसरले काय?- गोपाळदादा तिवारी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
Spread the love

मुंबई – जम्मू-काश्मीर (Jammu – Kashmir) प्रश्नी’ ‘युनो’त (uno) जाण्याच्या” पं. नेहरुंच्या (Pandit Nehru) धोरणाचे व निर्णयाचे, समस्त देशाने  निवडणुकांद्वारे वारंवार मान्य केले व तब्बल १७ वर्षे देशाच्या पंतप्रधानपदी पं. नेहरुंना (Pandit Nehru) बसवले, ही बाब अमित शहा (Amit Shaha) सोईस्कर विसरतात काय?  व ‘जनतेने समर्थन दिलेल्या निर्णयाचा’ उपमर्द करतात काय? असा उपरोधीक सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी (Gopaldada Tiwari) यांनी केला. पं नेहरूंच्या जम्मू काश्मिर विषयी कालबाह्य निर्णयावर एकतर्फी टिका करीत केंद्रातील भाजप सरकार (bjp Govt.) स्वतःचे अपयश झाकण्याचाच् सातत्याने प्रयत्न करत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.

स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशात स्वयंपुर्णतेचा व तांत्रिक साधन सामुग्रीचा तेंव्हा अभाव होता. त्या काळात युनो’त जाण्याचा निर्णय कालानारुप व परिस्थितीनुरुप होता.  देशवासियांकडुन शिक्कामोर्तब झालेल्या निर्णयाची पुन्हा कालबाह्य वाच्यता करणे म्हणजे शिळ्या कढीला ऊतु आणण्याचा निंदनीय प्रकार आहे, अशी टीका तिवारी यांनी केली.  

अधिक वाचा  #धक्कादायक: १६ वर्षीय शाळकरी मुलाला बेदम मारहाण करून त्याचा विवस्त्रावस्थेतील व्हि़डीओ सोशल मीडियावर केला व्हायरल

देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात, ब्रिटीश विरोधी संघर्षात तब्बल ७ वेळा सुमारे ११ वर्षे जेलमध्ये गेलेल्या पं. नेहरुंच्या संघर्षाची, विद्वत्तेची व पात्रतेची भाजपच्या कोणत्याही नेताशी तुलनाच होऊ शकत नाही. पं. नेहरुंचे नाव घेण्याची पात्रताही नसणाऱ्या अमित शहांनी त्यावर बोलणे हे “देशापुढील ज्वलंत मुद्यांवरील लक्ष विचलीत करण्याचे भाजप’चे सोईस्कर व पलायनवादी तंत्र असल्याचा आरोप गोपाळदादा तिवारी यांनी केला.

२०१४ व १९ च्या निवडणुकीत जनतेने पं नेहरुंच्या चुका दर्शवण्यासाठी नव्हे तर देशातील विद्यमान समस्या दुर करण्यासाठी, भ्रष्टाचार व काळा पैसा बाहेर काढुन जनतेस १५ लाख देऊन अच्छे-दिन आणण्यासाठी सत्ता बहाल केली होती, याचे स्मरण ठेवावे व देशावरील वाढते कर्ज, महागाई, बेरोजगारी, सामाजिक सलोखा, शांतता व सुरक्षेकडे अमित शहांनी अधिक लक्ष द्यावे असे खडे बोल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सुनावले.

अधिक वाचा  कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा - अजित पवार

स्वातंत्र्योत्तर भारताच्या’ उभारणीत योगदान नसणाऱ्यांनी पं नेहरुंच्या चुका काढण्या पेक्षा, ‘स्वतंत्र व विकसित आयता भारत’ हातामघ्ये आल्या नंतरही चिन ने हजारो किमी जमीन का बळकावली? याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी प्रथम ऊत्तर द्यावे, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love