मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट : एकजण ताब्यात


पुणे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे राजेंद्र काकडे (वय-५२, रा. वडगाव शिंदे हवेली) असे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणावरुण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी फेसबूकवर आक्षेपार्ह लिखाण हे लिखाण करण्यात आले आहे. काकडे याच्याविरोधात भादवि 500, 501 सह आयटी अॅक्ट क 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय 44) यांनी तक्रार दिली आहे.

अधिक वाचा  १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असणाऱ्यांचे समर्थन मविआ करते का? मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही- चंद्रकांत पाटील

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे हा स्वत: भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे सांगत आहे. त्याने आपल्या फेसबुक प्रोफाईलवरून मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love